Akshay Kumar: “भारतच माझं सर्वस्व..,” कॅनडाचं नागरिकत्व सोडून अक्षय कुमार बनणार ‘भारतीय’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:43 PM2023-02-23T22:43:27+5:302023-02-23T22:50:27+5:30

कॅनडाच्या नागरिकत्वावरून अनेकदा टीकेचा सामना करणारा बॉलिवूड स्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा याच विषयावरून चर्चेत आला आहे.

India is my everything bollywood actor Akshay Kumar will leave Canada citizenshipand become an Indian citizen | Akshay Kumar: “भारतच माझं सर्वस्व..,” कॅनडाचं नागरिकत्व सोडून अक्षय कुमार बनणार ‘भारतीय’

Akshay Kumar: “भारतच माझं सर्वस्व..,” कॅनडाचं नागरिकत्व सोडून अक्षय कुमार बनणार ‘भारतीय’

googlenewsNext

कॅनडाच्या नागरिकत्वावरून अनेकदा टीकेचा सामना करणारा बॉलिवूड स्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा याच विषयावरून चर्चेत आला आहे. अनेकदा त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. दरम्यान, आता “भारतच माझं सर्वस्व आहे आणि पासपोर्टमध्ये बदल करण्यासाठी अर्ज केला आहे,” असं अक्षयकुमारनं म्हटलंय. जेव्हा लोक आपल्याला कॅनडाचं नागरिकत्व घेण्यामागील कारण न समजता बोलातात तेव्हा वाईट वाटतं, असंही तो एका मुलाखतीदरम्यान म्हणाला.

भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही कमावलंय, जे काही मिळवलंय ते इथूनच मिळालंय. मला त्याची परतफेड करण्याची संधी मिळतेय हे मी माझं भाग्य मानतो. जेव्हा काहीही माहित नसताना लोक बोलतात तेव्हा वाईट वाटतं,” असं अक्षय कुमार यावेळी म्हणाला.

देश सोडणार होता
'हेरा फेरी', 'नमस्ते लंडन', 'टॉयलेट: एक प्रेम कथा' आणि 'पॅडमॅन' सारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षयनं त्याच्या कारकिर्दीतील त्या टप्प्याबद्दलही सांगितलं जेव्हा त्यानं १५ पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिले होते. १९९० च्या दशकातील हे चित्रपट होते. बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांच्या खराब कामगिरीमुळे आपण कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास प्रवृत्त झालो असल्याचंही तो म्हणाला. 'मला वाटलं होतं की माझे चित्रपट चालत नाहीत आणि मला काम करावं लागेल. मी तिथे कामासाठी गेलो होतो. माझा मित्र कॅनडामध्ये होता आणि त्यानं मला तिकडे बोलावलं, मी अर्ज केला आणि निघालो, असं त्यानं सांगितलं.

नागरिकत्व चर्चेचा विषय
'माझे फक्त दोन चित्रपट रिलीज व्हायचे होते आणि ते दोन्ही सुपरहिट झाले ही भाग्याची गोष्ट आहे. माझा मित्र म्हणाला, 'परत जा, पुन्हा कामाला लाग'. मला आणखी काही चित्रपट मिळाले आणि अजून काम मिळत राहिले. माझ्याकडे पासपोर्ट आहे हे मी विसरलो. हा पासपोर्ट बदलावा असे मला कधीच वाटले नव्हते पण आता हो, मी माझा पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला असल्याचं अक्षयनं स्पष्ट केलं. 

Web Title: India is my everything bollywood actor Akshay Kumar will leave Canada citizenshipand become an Indian citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.