भारताच्या विजयानंतर देशमुख कुटुंबियांचा जल्लोष, जिनिलियाने शेअर केली खास झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:47 IST2025-03-10T12:44:40+5:302025-03-10T12:47:14+5:30

भारताच्या विजयानंतर देशमुख कुटुंबियांचा जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

India Vs New Zealand Champions Trophy Final Team India Win Celebration Genelia Deshmukh Shared Video | भारताच्या विजयानंतर देशमुख कुटुंबियांचा जल्लोष, जिनिलियाने शेअर केली खास झलक

भारताच्या विजयानंतर देशमुख कुटुंबियांचा जल्लोष, जिनिलियाने शेअर केली खास झलक

संपूर्ण जगाचं लक्ष काल एकाच ठिकाणी वेधलं होतं. ते म्हणजे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांचा अंतिम सामना. क्रिकेटप्रेमींनी आणि भारतीय संघातील खेळाडूंनी जे स्वप्न पाहिलं होतं ते अखेर काल सत्यात उतरलं. भारतीय क्रिकेट संघाने काल म्हणजेच ९ मार्च रोजी न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (ICC Champions Trophy 2025) पटकावली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १२ वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. विजयानंतर देशमुख कुटुंबियांचा जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिनं खास व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहलं,  "भारताच्या विजयासाठी सर्वांचे लक्ष लागून लागून राहिलेले आणि आता आपण चॅम्पियन्स झालो आहोत". यामध्ये व्हिडीओमध्ये जिनिलीयाची दोन्ही मुलं भारत विजयी होताच आनंदाने  बेडवर उड्या मारताना दिसून येत आहेत. जिनिलियाही आपल्या सासूबाईंना आनंदानं मिठीही मारताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. 



भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये दिमाखदार विजय नोंदवत इतिहास रचला आहे. २०१३ नंतर टीम इंडियानं तिसऱ्यांदा या विक्रमी ट्रॉफीवर नाव कोरले. काल रात्रीपासूनच भारतात सर्वच ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आहे. प्रत्येक जण कानाकोपऱ्यातून भारतीय संघाचं कौतुक करतोय. संघातील प्रत्येक खेळाडूचा या विजयामागे मोलाचा वाटा आहे.  कलाकारांचाही आनंद गगनात मावेनासा झालाय. अभिनेते अमिताभ बच्चन, अजय देवगन ते सुनील शेट्टी यांनी सुद्धा पोस्ट शेअर करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

Web Title: India Vs New Zealand Champions Trophy Final Team India Win Celebration Genelia Deshmukh Shared Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.