India Won T20 World Cup : भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची स्पेशल पोस्ट, विराट कोहलीसाठी काय म्हणाली ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 09:02 AM2024-06-30T09:02:44+5:302024-06-30T09:03:08+5:30

भारताच्या विजयानंतर अभिनेत्री आणि किंग कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा  (Anushka  Sharma) हिने खास पोस्ट शेअर केली आहे. 

India Won T20 World Cup: Anushka Sharma Emotional Post After India Winning T20 World Cup 2024 Ind Vs Sa Final And Shared Post About Virat Kohli | India Won T20 World Cup : भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची स्पेशल पोस्ट, विराट कोहलीसाठी काय म्हणाली ?

India Won T20 World Cup : भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची स्पेशल पोस्ट, विराट कोहलीसाठी काय म्हणाली ?

India Won T20 World Cup : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केलं. भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. सामना जिंकल्यांतर जवळपास देशभरात जल्लोष झाला. सध्या सर्व स्तरांवर भारतीय टीमचं कौतुक करण्यात येत आहे. भारताच्या विजयानंतर अभिनेत्री आणि किंग कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा  (Anushka  Sharma) हिने खास पोस्ट शेअर केली आहे. 

भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माने भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. तिने सामना जिंकल्यानंतरचे संघाचे भावूक करणारे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शमध्ये तिनं लिहलं, 'आमच्या मुलीने आज सामना संपल्यावर या सगळ्या खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिलं. यावेळी सर्व खेळाडूंना मिठी मारण्यासाठी कोणी असेल का....असा प्रश्न तिनं केला. यावर मी तिला म्हणाले, 'हो डार्लिंग… कारण, आज जवळपास १.५ बिलियन प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंना मिठी मारली आहे. किती अभूतपूर्व विजय आणि किती महान कामगिरी!! चॅम्पियन्स - अभिनंदन!'.

अनुष्काने तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये विराटचा ट्रॉफी उंचावतानाचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहलं,  'माझं या माणसावर खूप प्रेम आहे. विराट कोहली. तू माझा आहेस, हे सांगताना मला प्रचंड आनंद होतो. आता हा आनंद साजरा करण्यासाठी माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये'. अनुष्काच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली  यांची जोडी ही फार लोकप्रिय आहे. ते दोघं अनेकांसाठी आयडियल कपल आहेत. नेकदा चाहते त्यांना परफेक्ट कपलही म्हणतात. दोघेही सोशल मीडियावर(Social Media) खूप सक्रिय असतात आणि एकमेकांसोबत फोटो शेअर करताना दिसतात. अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच 'चकदा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची घोषणा काही वर्षांपूर्वीच झाली असून शूटिंगही पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही.

Web Title: India Won T20 World Cup: Anushka Sharma Emotional Post After India Winning T20 World Cup 2024 Ind Vs Sa Final And Shared Post About Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.