Indian Air Strike : हवाई स्ट्राईकनंतर माहिरा खान म्हणते, यापेक्षा वाईट काहीही नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 12:24 PM2019-02-27T12:24:40+5:302019-02-27T12:25:51+5:30
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या या कारवाईने देशात जल्लोषाचे वातावरण असताना, पाकिस्तानमध्ये मात्र भीती आणि दहशतीचे वातावरण आहे.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या या कारवाईने देशात जल्लोषाचे वातावरण असताना, पाकिस्तानमध्ये मात्र भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. एकीकडे भारतीय बॉलिवूड सेलिब्रिटींनी भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर आनंद व्यक्त केला असताना दुसरीकडे पाकिस्तानी सेलिब्रिटींनी मात्र संभाव्य युद्धाच्या शक्यतांवर चिंता व्यक्त केली आहे. शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिला युद्धाच्या सावटाने चिंतेत टाकले आहे.
Nothing uglier. Nothing more ignorant than cheering for war. May sense prevail.. Pakistan zindabad. https://t.co/sH0VGGAERC
— Mahira Khan (@TheMahiraKhan) February 26, 2019
‘यापेक्षा वाईट काहीही नाही. युद्ध करणे एक मोठा मुर्खपणा आहे. लोकांना सुबुद्धी देवो. पाकिस्तान झिंदाबाद’, असे ट्वीट माहिराने केले आहे. माहिराच्या या ट्वीटला उत्तर देताना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची नात फातिमा भुट्टो हिनेही ‘युद्धासाठी प्रोत्साहित करणे, यापेक्षा वाईट काहीही नाही,’असे लिहिले आहे.
“There can be NO winners in war if we value Human Life at all.“
— MAWRA HOCANE (@MawraHocane) February 26, 2019
Christopher Holliday.
It’s time we understand this as humans.The media needs to take charge & stop being provocative. It’s our duty to inculcate peace & use our words for better & not worse.
Praying for peace always!
बॉलिवूड चित्रपट ‘सनम तेरी कसम’मध्ये झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री मारवा होकेन हिनेही लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. ‘युद्धात कुणीच विजेता नसतो. ही वेळ धैर्य, संयम आणि माणुसकी पाळण्याची आहे. माध्यमांनी लोकांच्या भावना भडकावणे थांबवायला हवे. शांतता राखणे हे आपले कर्तव्य आहे. आपले शब्द कौतुकासाठी असावेत, वाईटासाठी नाही,’ असे ट्वीट तिने केले आहे.
भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे जैश ए मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करीत त्योचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले जात आहे.