इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, फ्लॉप ठरलं सिंगिग-अ‍ॅक्टिंग करिअर

By तेजल गावडे | Published: October 7, 2020 02:35 PM2020-10-07T14:35:04+5:302020-10-07T14:35:50+5:30

प्लेबॅक सिंगर अभिजीत सावंतचा आज ३९ वा वाढदिवस साजरा करतो आहे.

Indian Idol's first winner Abhijeet Sawant disappears from Cineindustry, flops Singing-acting career | इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, फ्लॉप ठरलं सिंगिग-अ‍ॅक्टिंग करिअर

इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, फ्लॉप ठरलं सिंगिग-अ‍ॅक्टिंग करिअर

googlenewsNext

काही वर्षांपूर्वी देशाने एका प्रतिभावान कलाकारला पाहिले. या कलाकाराने आपल्‍या मधुर आवाजाने आणि संगीतावर असलेल्या प्रेमाने लाखोंची मने जिंकली होती. पहिलाच सुपरहिट अल्‍बम आणि बॉलिवुडमधील काही चित्रपटांमधील गाण्‍यांसह अभिजीत सावंत प्रत्‍येकाच्‍या आवडत्या गायकांच्‍या यादीमध्‍ये सामील झाला. प्लेबॅक सिंगर अभिजीत सावंतचा आज ३९ वा वाढदिवस साजरा करतो आहे. अभिजीत सावंत रिएलिटी टीव्ही शो 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला होता. यामधूनच अभिजीतने आपल्या करिअरची सुरूवात केली आहे. अभिजीत विजेता झाल्यानंतर त्याच्या करिअरची सुरुवात चांगली झाली. मात्र अभिजीत आज लाइमलाइटपासून दूर आहे.

अभिजीत सावंतचा जन्म मुंबईत ७ ऑक्टोबर १९८१ मध्ये झाला. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने आपले सगळे लक्ष संगीताकडे केंद्रीत केले. इंडियन आयडल जिंकल्यानंतर 'अभिजीत' नावाचे अल्बम लाँच केले. त्याचप्रमाणे याचवर्षी त्याने 'आशिक बनाया आपने' या सिनेमाकरता देखील पार्श्वगायन केले.


अभिजीत विजेता झाल्यानंतर त्याने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली. मात्र गेल्या बऱ्याच कालावधीपासून तो सिनेइंडस्ट्री आणि गायन क्षेत्रापासून लांब आहे. २००९ मध्ये 'लॉटरी' सिनेमात काम केले होते. मात्र तो सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर तो 'तीस मार खां' सिनेमातही दिसला.

अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. अभिजीतने गाण्याकडे दुर्लक्ष करत इतर गोष्टीत काम बघायला सुरूवात केली.

स्प्रेमिंटच्या जाहिरात काम केले तसेच टीव्ही शो सीआयडीमध्ये देखील काम केलं. अभिजीत टीव्ही शो नच बलिएमध्ये रिऍलिटी शोमध्ये दिसला. करिअरमध्ये वेगवेगळे काम केल्यानंतर अभिजीत आता या सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे.

Web Title: Indian Idol's first winner Abhijeet Sawant disappears from Cineindustry, flops Singing-acting career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.