'बूगी वूगी'मधून रिजेक्ट झाला होता राजकुमार राव, आता धमाकेदार परफॉर्मेन्ससाठी मिळाले 30 पैकी 30 मार्क्स

By गीतांजली | Published: October 25, 2020 06:00 AM2020-10-25T06:00:00+5:302020-10-25T06:00:02+5:30

राजकुमार राव आगामी चित्रपट 'छलांग'ला घेऊन चर्चेत आहे.

Indias best dancer rejected once from boogie woogie rajkummar rao scored perfect 30 | 'बूगी वूगी'मधून रिजेक्ट झाला होता राजकुमार राव, आता धमाकेदार परफॉर्मेन्ससाठी मिळाले 30 पैकी 30 मार्क्स

'बूगी वूगी'मधून रिजेक्ट झाला होता राजकुमार राव, आता धमाकेदार परफॉर्मेन्ससाठी मिळाले 30 पैकी 30 मार्क्स

googlenewsNext

राजकुमार राव आगामी चित्रपट 'छलांग'ला घेऊन चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी राजकुमार राव आणि नुसरत भरूचा डान्स  रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’च्या मंचावर या वीकेंडला येणार आहेत. दोन्ही कलाकार कंटेस्टंटचा परफॉर्मेन्स बघून  प्रभावित झाले होते आणि दोघांनीही त्यांच्यासोबत जोरदार नृत्य केले आहे.


राजकुमार राव यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये आपली कला दाखविली आहे आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. परंतु त्याच्या नृत्य कौशल्यांबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. राजकुमार राव एक उत्तम अभिनेता आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण तो एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्याला डान्सची फार आवड आहे. राजकुमारने ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’च्या मंचावर आपला डान्सता जलवा दाखवला शोचे जज त्याच्या डान्स मूव्स बघून इम्प्रेस झाले. त्यांनी राजकुमारच्या डान्सचे कौतुक करत त्याला 30 पैकी 30 मार्क दिले. 

बूगी वूगीमधून झाला होता रिजेक्ट 
राजकुमार रावने सोनी टीव्हीवरील पॉप्युलर शो 'बूगी बूगी'साठी ऑडिशन दिले होते. मात्र तो या ऑडिशनमधून रिजेक्ट झाला होता. राजकुमार सांगितले, "बर्‍याच वर्षांपूर्वी जेव्हा मी अकरावीत होतो, तेव्हा मी माझ्या लहान भावासोबत 'बूगी वूगी'च्या ऑडिशनसाठी मुंबईला आलो होतो. मात्र त्यावेळी मी रिजेक्ट झालो होतो. आज इथं दमदार परफॉर्मेन्स बघून खुश झालो. कंटेस्टंटसोबत माझ्या परफॉर्मेन्सला 30 पॉईंट्स देण्याऱ्या जज लोकांचे आभार.''

Web Title: Indias best dancer rejected once from boogie woogie rajkummar rao scored perfect 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.