‘विलेज रॉकस्टार्स’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 13:08 IST2018-12-18T13:05:59+5:302018-12-18T13:08:52+5:30
राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘विलेज रॉकस्टार्स’ हा आसामी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

‘विलेज रॉकस्टार्स’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद!!
राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘विलेज रॉकस्टार्स’ हा आसामी चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. द अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेसने ‘बेस्ट फॉरेन’ श्रेणीच्या पुढील फेरीसाठी निवडल्या गेलेल्या चित्रपटांच्या नावाची घोषणा केली. या नावांत ‘विलेज रॉकस्टार्स’चे नाव नाही.
‘बेस्ट फॉरेन’श्रेणीच्या पुढील फेरीसाठी ज्या चित्रपटांची निवड झाली तत बर्ड्स ऑफ पॅसेज (कोलंबिया), द गिल्टी (डेन्मार्क), नेव्हर लूक अवे (जर्मनी), शॉपलिफ्टर्स(जपान), आयका (कझाकिस्तान), कॅपरनाम (लेबनान), रोमा (मॅक्सिको), कोल्ड वॉर (पोलंड) आणि बर्निंग (साऊथ कोरिया) या चित्रपटांचा समावेश आहे.
प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या ‘ऑस्कर 2019’साठी भारताकडून ‘विलेज रॉकस्टार्स’ निवड करण्यात आली होती. पद्मावत, राजी , पीहू, कडवी हवा आणि न्यूड यांसारख्या चित्रपटांना मागे टाकत ‘विलेज रॉकस्टार्स’ या चित्रपटाने बाजी मारली होती.
रिमा दास दिग्दर्शित या आसामी चित्रपटान ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला होता. अनेक चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे कौतुक झाले आहे. ‘विलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट एका १० वर्षांच्या धुनु नामक मुलीची कथा आहे. स्वत:चे गिटार खरेदी करण्याचे तिचे स्वप्न असते़ आपल्या आजुबाजूच्या मुलांना एकत्र करून ती ‘विलेज रॉकस्टार्स’ नावाचा म्युझिक बँड बनवू इच्छिते. भनिता दास आणि बसंती दास यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.
छोट्या बजेटच्या या चित्रपटाला डिजिटल कॅमे-याने शूट केले गेले आहे. सेटवर कुठलाही प्रोफेशन क्रू नसताना हा चित्रपट शूट करण्यात आला. याबद्दल रिमा दास यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्याकडे चित्रपट बनवण्यासाठी केवळ एक डिजिटल कॅमेरा आणि एक कथा केवळ या दोनच गोष्टी होत्या. या दोनचं गोष्टीच्या भरवशावर चित्रपट पूर्ण करावा लागेल, हे मला ठाऊक होते.