केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेची खूण; पोलिसांनी दाखल केली अनैसर्गिक मृत्यूची केस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 09:27 AM2022-06-01T09:27:24+5:302022-06-01T09:34:07+5:30

KK unnatural Death Case Filed: सध्या याप्रकरणी न्यू मार्केट पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. जखमांमुळे पोलीस हॉटेल स्टाफची चौकशी करत आहेत.

Injuries on singer KK face and head unnatural death case filed autopsy today | केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेची खूण; पोलिसांनी दाखल केली अनैसर्गिक मृत्यूची केस

केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेची खूण; पोलिसांनी दाखल केली अनैसर्गिक मृत्यूची केस

googlenewsNext

KK unnatural Death Case Filed: प्रसिद्ध गायक केकेच्या मृत्यू प्रकरणात आता नवं वळण आलं आहे. केकेच्या डोक्यावर आणि ओठाव जखमांचे निशाण दिसून आले आहेत. ज्यामुळे अनैसर्गिक मृत्यूचा संशय व्यक्त केला जात आहे. अजून पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. मृत्यूचं खरं कारण पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येईल. सध्या याप्रकरणी न्यू मार्केट पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. जखमांमुळे पोलीस हॉटेल स्टाफची चौकशी करत आहेत.

दुसरीकडे कोलकाता पोलीस केकेच्या कुटुंबियांची वाट बघत आहेत. त्यांची सहमती आणि मृतदेहाची ओळख ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पोस्टमार्टम केले जाईल. ज्या हॉस्पिटलमध्ये केकेला नेण्यात आलं होतं, तिथेच पोस्टमार्टमची व्यवस्था केली जात आहे. असा अंदाज लावला जात आहे की, दुपारनंतर त्याचा मृतदेह त्याच्या परिवाराकडे सोपवण्यात येईल. 

दरम्यान बॉलिवूडमधील सर्वात चांगल्या गायकांपैकी एक केके म्हणजे कृष्णकुमार कुन्नथ काल रात्री कोलकाताच्या एका कॉलेजमध्ये परफॉर्म करत होता. तिथे साधारण एक तास परफॉर्म केल्यावर केके परत आपल्या हॉटेलवर गेला होता. तिथे त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
 

Web Title: Injuries on singer KK face and head unnatural death case filed autopsy today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.