Kareena Kapoor's Birthday : करिना कपूरला पती सैफकडून खास सरप्राईज, या ठिकणी केलं वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 15:37 IST2019-09-21T15:37:02+5:302019-09-21T15:37:45+5:30
Kareena Kapoor's Birthday : यावेळी करिनाने Kiss of Love म्हणतं अभिनेता आणि पती सैफ अली खानला किस करताना पाहायला मिळत आहे.

Kareena Kapoor's Birthday : करिना कपूरला पती सैफकडून खास सरप्राईज, या ठिकणी केलं वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
करिना आणि सैफ सध्या सेलिब्रेशनच्या मुडमध्ये आहेत. हे सेलिब्रेशन थो़डं खास आहे..सेलिब्रेशन थोडं हटके आहे... कारण आज बेबो अर्थात करिना कपूरचा हिचा आज 39 वा वाढदिवस आहे. करिना आपल्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन आपल्या कुटुंबासोबत पतौडी पॅलेसमध्ये करते.
यंदा करिनाने आपला वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन न ठेवता काही जवळच्याच मित्र मंडळी सोबत सेलिब्रेट केला असला तरीही तरीही या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करिनासोबत तिची बहिण करिश्मा कपूर देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती.
करिनाचं बर्थ डे सेलिब्रेशन अगदी मस्त सुरू असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे.या सेलिब्रेशनचे फोटो खूप बोलके आहेत. यावेळी करिनाने Kiss of Love म्हणतं अभिनेता आणि पती सैफ अली खानला किस करताना पाहायला मिळत आहे. करिना कपूरचे चाहतेही सोशल मीडियावर करिनाच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
पतौडी पॅलेसचा रस्ता विसरला सैफ अली खान, नंतर घ्यावा लागला या गोष्टीचा आधार
एअरपोर्टवरुन सैफने टॅक्सी हायर केली करीना मागच्या सीटवर बसली आणि सैफ पुढच्या सीटवर. जवळपास 2.30 च्या दोघे पतौडी शहरात पोहोचले. सैफ मात्र पॅलेसकडे जाण्याएवजी बाजाराच्या रस्त्याच्या दिशेने पुढे गेला. थोडा अंतरानंतर सैफला कळले की तो चुकीच्या रस्त्याने पुढे जातो आणि मग त्याने तिथल्या काही विद्यार्थ्यांना रस्ता विसरला. सैफला बघून त्या विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याने त्याला पॅलेसकडे जाण्याचा बरोबर रस्ता सांगितला. रस्ता सांगणाऱ्या विद्यार्थ्यांनी सैफसोबत सेल्फि काढण्याची संधी मात्री सोडली नाहीय.
करीना लवकरच 'हिंदी मीडियम २'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती पोलिस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात इरफान खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंग्रेजी मीडियम चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करत असून दिग्दर्शन होमी अदाजानिया करत आहेत.