९०च्या दशकातील या अभिनेत्रीला आता तिला ओळखणंही झालंय कठीण, महेश बाबूशी आहे तिचं खास नातं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 06:37 PM2023-02-25T18:37:15+5:302023-02-25T18:42:16+5:30
लग्नानंतरही तिला अनेक ऑफर आल्या होत्या पण तिने कुटुंबाला प्राधान्य दिले. सध्या ती दुबईमध्ये पती आणि मुलांसोबत राहते.
आज आम्ही बॉलिवूडच्या अशा एका अभिनेत्रीबाबत बोलत आहोत जिच्या नावाची चर्चा 80-90 च्या दशकात खूप होती. आम्ही बोलतोय ती अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) हिच्याबद्दल जी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत होती, पण अचानक तिने चित्रपटसृष्टी सोडल्यानंतरही खूप चर्चेत आली आहे. शिल्पा शिरोडकरचा जन्म २० नोव्हेंबर १९६९ रोजी झाला. शिल्पाच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने प्रसिद्ध चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांच्या 1989 मध्ये आलेल्या 'भ्रष्टाचार' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
शिल्पाने तिच्या शॉर्ट फिल्मी करिअरमध्ये अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते, यामध्ये गोपी किशन, बेवफा सनम, किशन कन्हैया, रघुवीर आणि आँखे इत्यादींचा समावेश होता. बातमीनुसार, शिल्पा शिरोडकरला खरी ओळख 'किशन कन्हैया' चित्रपटाच्या रिलीजनंतर मिळाली. या चित्रपटात शिल्पासोबत अनिल कपूर(Anil Kapoor) आणि माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) मुख्य भूमिकेत दिसले होते.
शिल्पा शिरोडकरने तिच्या करिअरच्या शिखरावर असतानाही बॉलिवूडला रामराम ठोकला. खरं तर, 2000 साली शिल्पाने ब्रिटनमध्ये राहणारा एक मोठा बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केलं. शिल्पा ही शिल्पाची सख्खी बहीण आहे आणि साऊथचा सुपरस्टार महेश बाबूची ती मेहुणी आहे.
लग्नानंतरही शिल्पाला कामाच्या अनेक ऑफर आल्या होत्या पण तिने कुटुंबाला प्राधान्य दिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा दुबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते.