रूग्णालयात उपचार घेत असलेल्या बिपाशा बासूने शेअर केला मजेशीर फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 06:09 AM2018-06-04T06:09:44+5:302018-06-04T12:19:32+5:30

अभिनेत्री बिपाशा बासू सध्या रूग्णालयात आहे. होय, श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर गत शनिवारी बिपाशाला मुंबईच्या हिंदुजा हेल्थकेअर ...

Interesting photo shared by Bipasha Basu, who is being treated at the hospital! | रूग्णालयात उपचार घेत असलेल्या बिपाशा बासूने शेअर केला मजेशीर फोटो!!

रूग्णालयात उपचार घेत असलेल्या बिपाशा बासूने शेअर केला मजेशीर फोटो!!

googlenewsNext
िनेत्री बिपाशा बासू सध्या रूग्णालयात आहे. होय, श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर गत शनिवारी बिपाशाला मुंबईच्या हिंदुजा हेल्थकेअर रूग्णालयात भरती करण्यात आले होते. सध्या बिप्स डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. याचदरम्यान बिपाशाने रूग्णालयातील आपला एक मजेशीर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.



गेल्या अनेक दिवसांपासून बिपाशा हिंदुजा रूग्णालयात उपचारासाठी जात आहे. काही दिवसांपूर्वी ती रूग्णालयात दिसली आणि तिच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरू झाली. पण बिप्सने या सगळ्या चर्चा खोट्या असल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपाशाच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्यात. तथापि या चाचण्यांमधून काय बाहेर आले, ते अद्याप कळले नाही़. तिच्यावर उपचार सुरू असून हळूहळू तिची प्रकृती सुधारतेय. बिपाशा लवकर बरी व्हावी, अशा शुभेच्छा तिल्या देऊयात.
बिपाशाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर गेल्या तीन वर्षांपासून ती चित्रपटांपासून दूर आहे. ‘अलोन’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. याच चित्रपटाच्या सेटवर तिचे करण सिंग ग्रोव्हरसोबत प्रेम फुलले होते. पुढे दोघांनीही लग्न केले. लवकरच हे कपल विक्रम भट्ट यांच्या चित्रपटात दिसणार असल्याचे कळतेय.
लग्नाआधी बिपाशाची बॉलिवूडमध्ये नाही म्हणायला ब-यापैकी चलती होती. पण लग्नानंतर अचानक बिपाशा मागे पडली. काहींच्या मते, लग्नानंतर काही  निमार्ते - दिग्दर्शक बिपाशाकडे आॅफर घेऊन गेलेत. पण बिपाशाने म्हणे, स्वत:सोबत हबी करणलाही कास्ट करावे, अशी अट त्यांच्यापुढे ठेवली. मग काय, बिपाशाही नको अन करणही नको म्हणून पुढे बिप्सला आॅफर्स मिळणेचं बंद झाले. तेव्हापासून बिप्स व करण दोघांकडेही काम नव्हते. पण आता या ‘मंकी लव्हर्स’ला (बिप्स व करणला  मंकी लव्हर्स  म्हणून ओळखले जाते.) एक प्रोजेक्ट मिळालाय. होय, या दोघांनी एक चित्रपट साईन केल्याचे कळतेय. ताजी बातमी खरी मानाल तर ‘आदत’ या चित्रपटात बिपाशा व करण एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा विक्रम भट्ट यांनी लिहिलेय. म्हणजेच एकंदर काय तर लग्नानंतर पहिल्यांदा बिप्स व करण कुण्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटींगही सुरु झाल्याचे कळतेय.

also read : बिपाशा-करणचा दिसला रोमॅण्टिक अंदाज; पाहा व्हिडीओ!

काही दिवसांपूर्वी हे मंकी लव्हर्स एक टीव्ही शो होस्ट करणार अशी बातमी होती. यानंतर बिपाशा गायक मिका सिंहच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर वापसी करणार, अशी बातमी आली. पण आता मंकी लव्हर्सच्या मोठ्या पडद्यावरील वापसीच्या बातमीवर मोहोर लागली आहे. भूषण पटेल हा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याचे कळतेय. भूषण यांनी २०१५ मध्ये आलेला बिप्स व करणचा ‘अलोन’ दिग्दर्शित केला होता. 

Web Title: Interesting photo shared by Bipasha Basu, who is being treated at the hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.