International Women's Day 2020 : 'या' महिला दिग्दर्शकांनी दाखविली ‘वूमन्स पॉवर’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:45 AM2020-03-08T11:45:55+5:302020-03-08T11:50:27+5:30
आज जागतिक महिला दिवस आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून आज आपण अशा काही महिला दिग्दर्शकांच्या बाबतीत जाणून घेऊया ज्यांनी पुरुष दिग्दर्शकांच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेक्षेत्रात आगळावेगळा ठसा उमटविला आहे.
-रवींद्र मोरे
आज जागतिक महिला दिवस आहे. दीर्घ काळापासून संपूर्ण जगभरात हा दिवस महिलांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हा एक असा दिवस आहे, ज्या दिवशी महिला आपले स्वातंत्र्य मोठ्या उत्साहात साजरा करतात. बॉलिवूडमध्येही हा दिवस विशेष पद्धतीने साजरा केला जातो. आजच्या दिवसाचे औचित्य साधून आज आपण अशा काही महिला दिग्दर्शकांच्या बाबतीत जाणून घेऊया ज्यांनी पुरुष दिग्दर्शकांच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेक्षेत्रात आगळावेगळा ठसा उमटविला आहे.
जोया अख्तर
सिनेमा पर अच्छी पकड़ बना चुकी जोया अख्तर ने 'लक बाय चांस' और 'जिंदगी मिलेगी ना दोबारा' जैसी हिट फिल्मों का निर्देशन किया। आज इन्हें बॉलीवुड में एक सफल महिला निर्देशक के रूप में जाना जाता है। आखिरी बार उन्होंने गली ब्वॉय और का निर्देशन किया था। जिसे भारत की तरफ से आॅस्कर के लिए भेजा गया था।
* मीरा नायर
दिग्दर्शिका मीरा नायर यांची सिनेक्षेत्रात वेगळीच ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांची ही ओळख त्यांच्या चित्रपटातूनही दिसून येते. मीरा यांनी ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘मान्सून वेडिंग’ यासारखे चित्रपट बनविले आहेत. ‘सलाम बॉम्बे’ भारताकडून आॅस्करसाठी बेस्ट फॉरेन लॅग्वेज कॅटेगरीमध्ये पाठविण्यात आलेला दुसरा चित्रपट होता. मीरा यांनी अमेलिया, क्विन आॅफ काट्वे, द नेमसेक आदी हॉलिवूडपट देखिल दिग्दर्शित केले आहेत.
* अश्विनी अय्यर तिवारी
दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांना २०१७ मध्ये त्यांचा चित्रपट 'निल बटे सन्नाटा' साठी फिल्म फेयर सर्वश्रेष्ठ (डेब्यू) दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला आहे. याशिवाय त्यांनी बरेली की बरफी आणि पंगा यासारख्या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे.
* फातिमा बेगम
फातिमा बेगम ह्या बॉलिवूडची पहिला महिला चित्रपट दिग्दर्शिका होत्या. १९२६ मध्ये त्यांनी ‘बुलबुल ए परिस्तान' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्याकाळी वैशिष्टपूर्णच महिला पुढे जाऊ शकत होत्या.
* लीना यादव
लीना यादव ह्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट दिग्दर्शिका आहेत. त्यांनी ‘शब्द’, ‘तीन पत्ती’ आणि ‘पार्च्ड’ यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ‘पार्च्ड’ चित्रपटाची टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये खूपच प्रशंसा झाली होती. हा चित्रपट बाल विवाह, पितृ सत्तात्मक कुटुंब, रुढिवादी परंपरा आणि मॅरिटल रेप यासारख्या विषयांवर आधारित होता.
* गौरी शिंदे
'इंग्लिश- विंग्लिश' आणि 'डियर जिंदगी' यासारख्या चित्रपटासोबतच आपले दिग्दर्शन, लेखन आणि विचारसरणीने गौरी शिंदे यांची एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे यांच्या वरील दोन्हीही चित्रपटात महिला संबंधी विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे आणि २०१२ मध्ये फिल्म फेअरचा बेस्ट चित्रपट दिग्दर्शक (डेब्यू)चा सन्मानही मिळालेला आहे.