कलाविश्वातील पहिल्या स्टंट वूमनविषयी माहितीये का? 'शोले गर्ल' म्हणून मिळवली होती ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 12:14 PM2022-03-08T12:14:29+5:302022-03-08T12:14:53+5:30

Reshma pathan: बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आज अभिनेत्रींचेही साहसदृश्य दाखवली जातात. मात्र, हे प्रत्येक शूट खुद्द अभिनेत्री करत नसून त्यासाठीही स्टंटवूमन आहेत.

international womens day bollywood first stunt woman reshma pathan | कलाविश्वातील पहिल्या स्टंट वूमनविषयी माहितीये का? 'शोले गर्ल' म्हणून मिळवली होती ओळख

कलाविश्वातील पहिल्या स्टंट वूमनविषयी माहितीये का? 'शोले गर्ल' म्हणून मिळवली होती ओळख

googlenewsNext

स्टंटमॅन हा शब्द आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. खासकरुन साहसदृश्यांसाठी चित्रपटांमध्ये स्टंट मॅनची नियुक्ती केली जाते. आज असे अनेक कलाकार आहेत हे जे स्वत: साहसदृश्य न करता त्यासाठी स्टंट मॅनची मागणी करतात. त्यामुळे आज कलाविश्वात अनेक लोकप्रिय स्टंटमॅन असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे स्टंटमॅन हा शब्द सर्वप्रचलित आहे. पण, स्टंट वूमनविषयी कधी ऐकलंय का? बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींसाठीही स्टंटवूमन आहेत. मात्र, त्यांच्याविषयी फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळे कलाविश्वातील पहिली स्टंट वूमन नेमकी कोण हे जाणून घेऊयात.

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आज अभिनेत्रींचेही साहसदृश्य दाखवली जातात. मात्र, हे प्रत्येक शूट खुद्द अभिनेत्री करत नसून त्यासाठीही स्टंटवूमन आहेत. अगदी शोले, अंधा कानून अशा कितीतरी चित्रपटांमध्ये दिग्गज अभिनेत्रींचे स्टंट काही स्टंटवूमनने केले आहेत. त्यामुळेच बॉलिवूडमधील पहिल्या स्टंटवूमनविषयी जाणून घेऊ.

कोण आहे पहिली स्टंट वूमन?

बॉलिवूडमधल्या पहिल्या स्टंटवूमनचं नाव आहे रेशमा पठाण. बॉलिवूडमधील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.  परंतु, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना त्या मृत्युच्या दारातून पुन्हा परतल्या आहेत.

'शोले'च्या चित्रीकरणावेळी झाला होता मोठा अपघात

१५ ऑगस्ट १९७५ मध्ये शोले प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये हेमा मालिनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांचा एक सीन होता, ज्यात त्यांचा डांगा एका दगडावर आदळतो आणि तो तुटतो. हा सीन हेमा मालिनी यांच्या ऐवजी स्टंट वूमन रेशमा पठाण यांनी केला. मात्र, हा सीन शूट करत असताना टांगा तुटून पडण्याऐवजी चक्क रेशमा यांच्या अंगावर पडला. यावेळी त्यांना मोठी इजा झाली होती. इतकंच नाही तर त्या मरता मरता वाचल्या होत्या. इतकंच नाही तर कर्ज चित्रपटात शोभा खोटे यांचं बॉडी डबल करतानाही त्यांना अशाच अपघाताला सामोरं जावं लागलं होतं.

भोजपुरी सिनेक्षेत्रातही केलंय काम

रेशमा यांनी हेमा मालिनी, श्री देवी, रेखा मीना कुमारी, बिंदिया गोस्वामी अशा कितीतरी अभिनेत्रींसाठी बॉडी डबलचं काम केलं आहे. तसंच त्यांनी भोजपुरी सिनेक्षेत्रातही काम केलं आहे.
 

'या' चित्रपटांसाठी केलं बॉडी डबलचं काम

'शोले', 'अंधा कानून', 'शान', 'मुझे मेरी बीवी से बचाओ' ,'मेरे अपने'  या चित्रपटांसाठी काम केलं आहे.

Web Title: international womens day bollywood first stunt woman reshma pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.