IPL ची कॉमेंट्री करताना दिसला ऑरी! भडकले नेटकरी, म्हणाले, "वर्ल्डकप हिरोंबरोबर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 08:55 AM2024-03-23T08:55:35+5:302024-03-23T08:55:57+5:30
IPL च्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑरीला पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले...
IPL च्या नव्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. शुक्रवारी(२२ मार्च) आयपीएलच्या १७व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा पार पडला. अक्षय कुमार, ए.आर.रहमान, सोनू निगम, टायगर श्रॉफ या बॉलिवूड कलाकारांनी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करत चार चांद लावले. यावेळी आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑरीदेखील दिसला. पण, हे पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला.
सेलिब्रिटींच्या पार्टी आणि लग्नसमारंभात दिसणारा ऑरी यंदा मात्र आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसून आला. जिओ सिनेमावर सुरू असलेल्या आयपीएलमधील कमेंटेटर्स पॅनेलमध्ये ऑरीही दिसला. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सहवागबरोबर त्याने कॉमेंट्री करत त्याचा हेलिकॉप्टर शॉट दाखवला. पण, कॉमेंट्री बॉक्समध्ये क्रिकेटमधील दिग्गजांबरोबर ऑरीला पाहून मात्र नेटकरी संतापले आहेत. आयपीएलमधील ऑरीचे फोटो शेअर करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
"ऑरी क्रिकेट एक्सपर्ट आहे का? वर्ल्ड कपच्या हिरोंबरोबर हा स्टेज शेअर करत आहे', असं एकाने म्हटलं आहे. "याने फक्त सेलिब्रिटींबरोबरच सेल्फी घ्याव्यात", अशी कमेंटही केली आहे.
Ye orry kaun sa cricket expert hai?
— R A T N I S H (@LoyalSachinFan) March 22, 2024
Man is sharing the stage with our World Cup heroes. pic.twitter.com/XbE8Wv4GKO
"भारताच्या क्रिकेट इतिहासातील काळा दिवस", असं म्हणत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
A Black day for IPL history.
— Vipin Tiwari (@Vipintiwari952_) March 21, 2024
Orry with zero cricket knowledge will be commentating tomorrow on JioCinema.
pic.twitter.com/76TxFlboeS
"यांच्याकडे काही टॅलेंट नसल्यामुळे ते बिग बॉसमध्ये होते. आयपीएल खराब करू नका"
Jio needs to realize that Bigboss fans can be IPL fans but most IPL fans are not Bigboss fans.
First Orry and now Shefali Bagga. This needs to stop. They are untalented and hence they are on Bigboss. Don't ruin IPL watching experience please— Shreya (@shreyamatsharma) March 22, 2024
दरम्यान, आयपीएल २०२४ मधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि चेन्नई सुपर किंग्ज दोन टीममध्ये खेळवला गेला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारत पहिला विजय मिळवला. बंगळुरूने दिलेल्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने १८.४ षटकांत ४ बाद १७६ धावा करून विजय साकारला.