IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीवर अन्याय? अभिनेत्रीच्या डान्सवर कात्री अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 10:23 IST2025-03-23T10:22:48+5:302025-03-23T10:23:21+5:30

IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीने शानदार डान्स केला. परंतु हा परफॉर्मन्स पूर्ण दाखवण्यात आला नसल्याने चाहत्यांची निराशा झाली

IPL 2025 opening ceremony disha patni dance performance cut while telecast | IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीवर अन्याय? अभिनेत्रीच्या डान्सवर कात्री अन्...

IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीवर अन्याय? अभिनेत्रीच्या डान्सवर कात्री अन्...

 

कोलकातामध्ये काल (२२ मार्च) IPL 2025 चा शानदार उद्धाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेता शाहरुख खानने (shahrukh khan) चार चाँद लावले. याशिवाय IPL 2025 मध्ये काल KKR आणि RCB मध्ये ओपनिंग मॅच झाली. त्या दोन्ही संघातील खेळाडू अर्थात विराट कोहली, (virat kohli) रिंकू सिंग अन् इतरांनी शाहरुखसोबत परफॉर्मन्स दिला. IPL 2025 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये श्रेया घोषाल, दिशा पाटनी (disha patni) यांनी खास परफॉर्मन्स दिला. परंतु या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीवर अन्याय झाल्याचं बोललं जात आहे.

दिशा पाटनीचा परफॉर्मन्स कापला?

झालं असं की, IPL 2025 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीच्या शानदार परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधलं. दिशाची एनर्जी आणि खास अदांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. परंतु या परफॉर्मन्सच्या वेळी अनेक कट्स लावण्यात आले. कॉमेंट्री करणाऱ्यांनी आरसीबी आणि केकेआरच्या मॅचकडे लक्ष केंद्रीत केलं. त्यामुळे दिशाचा परफॉर्मन्स चांगला असूनही त्यावर कट्स लावण्यात आले. सलग परफॉर्मन्स न दाखवता मध्येमध्ये हा परफॉर्मन्स दाखवण्यात आला. त्यामुळे दिशाच्या फॅन्सची घोर निराशा झाली असून अभिनेत्रीवर अन्याय झाल्याचं त्याचं म्हणणं आहे.



दिशाने IPL परफॉर्मन्ससाठी किती मानधन घेतलं?

दिशा पाटनीचा परफॉर्मन्स नीट दाखवण्यात आला नसला तरी अभिनेत्रीने तिचं काम चोख केलं. याशिवाय दिशाने करण औजलासोबतही खास डान्स केला. मीडिया रिपोर्टनुसार असं सांगण्यात येतंय की, दिशाने IPL 2025 च्या ओपनिंग सेरेमनीसाठी २२ ते ५० लाखांची फी घेतली. त्यामुळे दिशाने IPL 2025 च्या ओपनिंग सेरेमनीतील डान्ससाठी तगडं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. 

Web Title: IPL 2025 opening ceremony disha patni dance performance cut while telecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.