'ए, क्या बोलती तू..' गाण्यावर मामा-भाच्याने धरला ठेका, आयराच्या संगीत फंक्शनचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 02:23 PM2024-01-12T14:23:26+5:302024-01-12T14:24:08+5:30
आमिर खानने भाचा इमरान खानसह केला डान्स. मामा-भाच्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान आणि नुपूर शिखरेचा ग्रँड विवाहसोहळा उदयपूर येथे पार पडला. मुंबईत रजिस्टर मॅरेज केल्यानंतर या कपलने उदयपूर येथे ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. या लग्नात आमिर खानच्या दोन्ही एक्स वाईफ रीना दत्ता आणि किरण राव होत्या. तसंच आयराचा सख्खा भाऊ जुनैद खान आणि सावत्र भाऊ आजाद खानही हजर होते. सोबतच आमिर खानचा भाचा 'जाने तू या जाने ना' फेम अभिनेता इमरान खानही गर्लफ्रेंडसह दिसला. आयराच्या संगीत फंक्शनला आमिर खानने भाचा इमरानसह (Imran Khan) डान्स केला.
आयरा खानचं संगीत फंक्शन हे इतर बॉलिवूड कपल्सच्या संगीत पेक्षा खूपच वेगळं होतं. आयराच्या संगीतमध्ये आमीर खानने स्वत: स्टेजवर खाली बसून जुनी हिंदी गाणी गायली. त्याला एक्स वाईफ किरण राव आणि छोट्या आझाद खानची साथ मिळाली. तर दुसरीकडे नंतर आमिरने बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला. यावेळी त्याचं सुपरहिट गाणं 'ए क्या बोलती तू...' गाण्यावर आमिर खान आणि भाचा इमरान खान नाचताना दिसले. मामा-भाच्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
आमिर खानने त्याचा भाचा इमरान खानला 2008 साली आलेल्या 'जाने तू या जाने ना' मधून लाँच केले होते. हा सिनेमा तरुणांचा अत्यंत आवडीचा सिनेमा आहे. आज १५ वर्षांनीही हा सिनेमा तेवढ्याच उत्साहाने पाहिला जातो. नंतर इमरान खानने काही सिनेमात काम केले पण त्याला फारसे यश मिळाले नाही. सध्या तो मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. तसंच इमरान खान आणि पत्नी अवंतिका यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा आहेत. इमरान सध्या अभिनेत्री लेखाला डेट करत आहे. आयराच्या लग्नात इमरानचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल झाले होते.