​इरफान खान म्हणतो, जयपूर थेअटरचे ॠ ण चुकविण्याची ही संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 09:06 PM2016-11-22T21:06:34+5:302016-11-22T21:06:34+5:30

बॉलिवूडमध्ये स्वत:च्या अभिनयाने आपली ओळख निर्माण करणार अभिनेता इरफान खानने आपल्या अंगावर असलेले ॠ ण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

Irfan Khan says, this opportunity to miss Jaipur theater | ​इरफान खान म्हणतो, जयपूर थेअटरचे ॠ ण चुकविण्याची ही संधी

​इरफान खान म्हणतो, जयपूर थेअटरचे ॠ ण चुकविण्याची ही संधी

googlenewsNext
ong>बॉलिवूडमध्ये स्वत:च्या अभिनयाने आपली ओळख निर्माण करणार अभिनेता इरफान खानने आपल्या अंगावर असलेले ॠ ण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. तो जयपूर येथे आयोजित केला जाणारा ‘जयरंगम जयपूर थेअटर महोत्सवा’चे प्रमोशन करणार असून यामाध्यमातून मला जयपूर थेअटरची सेवा करता येणार आहे ही माझ्यासाठी ॠ ण फेडण्याची संधी असल्याचे तो मानतो.  

इरफान खान आपली मातृभूमी राजस्थान येथील टोंक थेअटरसाठी करण्यात येणाºया प्रयत्नांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. 2012 साली सुरू करण्यात आलेल्या जयरंगम म्हणजेच जयपूर थेअटर महोत्त्सवाने देशात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या वर्षी इरफान खान या महोत्त्सवाचा चेहरा होण्याचे त्याने मान्य केले असून या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. कला थेअटर म्हणून जयपूर आता आपली ओळख निर्माण करू लागला असून मुख्यधारेत समाविष्ठ होत आहे. इरफानच्या मते, याला समोर आणण्याची गरज आहे, राज्यात थेअटर क लेला प्राथमिकता मिळण्याची गरज आहे. 

#AuJairangam is thankful to @irrfank for launching poster "EVERY LAST CHILD" at Shilpgram (JKK). He interacted with news editors & audience pic.twitter.com/wr2T2p3HBG— Jairangam जयरंगम (@jairangam) November 22, 2016}}}} ">http://



इरफान म्हणाले, तरुण असताना मला थेअटरचा भाग व्हावे असे वाटत होते. मात्र त्यावेळी शहरात एखाद्याच वेळी नाटक होत असे, त्यावेळी जे दोन-चार नाटके व्हायची ती फार गंभीर होती किंवा ती गरजेहून नाटकीय होती. त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोणही वेगळा होता. या महोत्सवाचा भाग झाल्याने मला आनंद होतो आहे. कारण यामुळे आपण थेअटरला सर्वसामन्यांपर्यंत पोहचवू शकतो. हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर यामाध्यमातून लोकांना बरेच काही शिकता येते. सुरुवातील लोक म्हणायचे व तसा दावाही करायचे की थेअटर येथे दीर्घ काळ टीकू शकणार नाही. मात्र मला वाटते थेअटरची लोकप्रियता कधीच कमी होणार नाही आणि याची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. 

आपल्या उपस्थितीने व समर्थनाने इरफान थेअटरमध्ये योगदान देऊ इच्छितो, कारण त्याने येथूनच सुरुवात केली व अभिनयाच्या लहान लहान गोष्टी शिकायला मिळाल्या. 27 नोव्हेंबरपर्यंत चालणाºया या महोत्सवात मानव कौल, परेश रावल, मकरंद देशपांडे, कुमुद कौल यांच्यासह अनेक दिग्दज कालवंताच्या नाटकांचे मंचन होणार आहे. 

Web Title: Irfan Khan says, this opportunity to miss Jaipur theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.