इरफान खानची पत्नी सुतपा सिकदरने पतीच्या आजारपणाबाबत सोशल मीडियावर लिहिली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 05:52 AM2018-03-10T05:52:53+5:302018-03-10T11:22:53+5:30
इरफान खानने काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्वीटमुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. मी एका दुर्धर आजाराने ग्रासलो असल्याचे त्याने ...
इ फान खानने काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्वीटमुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. मी एका दुर्धर आजाराने ग्रासलो असल्याचे त्याने या ट्वीटमध्ये म्हटले होते. तेव्हापासून इरफानला काय झाले आहे याची चर्चा मीडियात रंगली आहे. इरफानला ब्रेन ट्युमर किंवा ब्लड कॅन्सर असल्याच्या शक्यता देखील काही वर्तमानपत्रातून वर्तवल्या गेल्या आहेत. पण इरफानने याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. त्याची पत्नी सुतपा सिकदरने नुकतेच फेसबुक अकाऊंटवरून इरफानच्या आजारपणाबद्दलची एक पोस्ट लिहिली आहे. सुतपाने तिच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, माझा बेस्ट फ्रेंड आणि जोडीदार हा एक लढय्या असून तो अतिशय चांगल्याप्रकारे प्रत्येक गोष्टीचा सामना करत आहे. मी सध्या कोणाचे फोन उचलत नाहीये, तसेच मेसेजने रिप्लाय देत नाहीये. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. इरफानसाठी तुम्ही सगळे ज्या प्रार्थना करत आहात, त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. मला आणि माझ्या साथीदाराला या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देवाने जी ताकद दिली आहे, त्यासाठी मी देवाची ऋणी आहे. सध्या माझे संपूर्ण लक्ष इरफानकडे आहे. सगळ्यांच्या शुभेच्छा इरफानच्या मागे असल्याने तो या कठीण काळातून लवकरात लवकर बाहेर येईल याची मला खात्री आहे. इरफानला काय झाले आहे याबाबत लोकांच्या मनात उत्सुकता असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण अशाप्रकारे तर्क लावण्यात तुमची उर्जा वाया घालवू नका. मी सगळ्यांना आयुष्यावर मिळवला जाणारा विजय आणि विजयानंतरचा उत्साह यावर लक्ष केंद्रित करण्याची मी विनंती करेन. माझे कुटुंब लवकरच तुमच्या या आनंदात तुमच्यासोबत सहभागी होईल. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार...
इरफानच्या आजाराबाबत कोणीही अफावा पसरवू नका असे इरफानने त्याच्या पहिल्याच ट्विटरच्या पोस्टमध्ये लोकांना आवाहन केले होते. डॉक्टर आजाराच्या निदानापर्यंत पोहचल्यानंतर मी पुढच्या १० दिवसात स्वतःच माहिती देईन असे इरफानने ट्वीट करून त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. इरफानची तब्येत लवकरात लवकर चांगली होऊ दे यासाठी त्याचे फॅन्स प्रार्थन करत आहेत.
Also Read : ...म्हणून इरफान खान शूटिंग अर्धवट सोडून घरी गेला