​सलमानच्या सिनेमात इरफानची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 10:38 AM2016-11-17T10:38:56+5:302016-11-17T10:42:33+5:30

‘दबंग’ सलमान खानच्या बॅनरअंतर्गत तयार होणाऱ्या आगामी चित्रपटात अष्टपैलू अभिनेता इरफान खानची वर्णी लागली आहे. ‘लायन्स आॅफ द सी’ ...

Irfan recounts in Salman's movie | ​सलमानच्या सिनेमात इरफानची वर्णी

​सलमानच्या सिनेमात इरफानची वर्णी

googlenewsNext
बंग’ सलमान खानच्या बॅनरअंतर्गत तयार होणाऱ्या आगामी चित्रपटात अष्टपैलू अभिनेता इरफान खानची वर्णी लागली आहे. ‘लायन्स आॅफ द सी’ या इंग्लिश पिरीयड ड्रामा सिनेमाची सलमान निर्मिती करणार असून त्यामध्ये इरफान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सुत्रांनुसार, ‘कोमगाटा मारू’ नावाच्या जहाजासंबंधीत घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. ‘कोमगाटा मारू’ ही एक जपानी जहाज होती ज्यामध्ये ३४० शीख, २४ मुस्लिम आणि १२ हिंदू असे ३७६ भारतीय ब्रिटिशकालीन भारतातून १९१४ साली कॅनडला स्थलांतर करत होते. परंतु त्यापैकी केवळ २४ लोकांनाच कॅनडामध्ये प्रवेश मिळाला.

बाकी सर्वांना त्या जहाजाबरोबर पुन्हा भारतात रवाना करण्यात आले. हाँगकाँग येथून ही जहाज शांघाय (चीन) मार्गे योकोहामा (जपान) ते व्हँकुवरला (कॅनडा) गेली होती. विशेष म्हणजे यावर्षी मे महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांनी या घटनेविषयी जाहीर माफी मागितली.


ट्रॅजेडी : कोमगाटा मारू जहाज


स्थलांतर : कोमगाटा मारू जहाजाने कॅनडाला आलेले शीख प्रवासी

चित्रपटात इरफान ‘गुरदीत सिंग’ नावाच्या शीख व्यक्तीची भूमिका साकारणार असून सिनेमाची पुढच्या वर्षी शूटींग सुरू होणार आहे. मुख्य नायिका आणि दिग्दर्शकाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. ऐतिहासिक सत्यकथेचा विचार करता चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली एवढे नक्की. भाईजान स्वत: एखाद्या भूमिकेत दिसणार का? हादेखील प्रश्न आहे.


अष्टपैलू : इरफान खान

‘बजरंगी भाईजान’ आणि सूरज पांचोली-अथिया शेट्टी स्टारर ‘हीरो’नंतर सलमान खान निर्मित हा तिसरा चित्रपट असेल. सध्या तो कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’मध्ये व्यस्त असून त्यानंतर यशराज बॅनरच्या ‘टायगर जिंदा है’ची शूटींग सुरू करणार आहे. ट्यूबलाईट’ हा चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून चीनी अभिनेत्री झू झू यातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘टायगर जिंदा है’ हा २०१२ साली आलेल्या ‘एक था टायगर’चा सिक्वेल आहे.

Web Title: Irfan recounts in Salman's movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.