मै आपके साथ हूँ भी और नहीं भी... इरफान खानचा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 15:42 IST2020-02-12T15:40:35+5:302020-02-12T15:42:10+5:30
इरफानचा चाहत्यांसाठी एक खास संदेश...

मै आपके साथ हूँ भी और नहीं भी... इरफान खानचा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील
न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असलेला अभिनेता इरफान खानच्या पुनरागमनाकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. आता मात्र इरफानच्या चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. होय, इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा येत्या दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. उद्या 13 तारखेला या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. तत्पूर्वी इरफानने आपल्या चाहत्यांसाठी एक खास संदेश शेअर केला आहे.
इरफानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. इरफानच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलेला हा व्हिडीओ भावूक करणारा आहे.
‘मै आज आपके साथ हूँ भी और नहीं भी.. ये फिल्म अंग्रेजी मीडियम बहुत खास है. सच, यकीन मानिए, मेरी दिल की ख्वाहिश थी की इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करू जितने प्यार से हम लोगोंने बनाया है. लेकिन, मेरे शरीर के अंदर कुछ अनवाँटेड मेहमान बैठे हुए है उनसे वातार्लाप चल रहा है. देखते है किस करवट उठ बैठता है. बोलने मै अच्छा लगता है पर सच मै जब जिंदगी आपके हाथ मै निंबू थमाती है ना, तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है. लेकिन आपके पास और चॉईस भी क्या है पॉझिटिव्ह रहने के अलावा? इन हालात मै निंबू की शिकंजी बना पाते है की नाही बना पाते है, ये आप पर है. पर हम सबने इस फिल्म को उसी पॉझिटिव्हिटी के साथ बनाया है. पर मुझे उम्मीद है की ये फिल्म आपको सिखाएगी, हसाएगी, रुलाएगी, फिर हसाएगी शायद....असे इरफान यात म्हणतोय.
इरफानचा ‘अंग्रेजी मीडियम’ येत्या 20 मार्चला रिलीज होतोय.