"अम्मा मुझे लेने आई हैं..."; अखेरचा श्वास घेण्यापूर्वी असे होते इरफान यांचे शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 09:40 PM2020-04-29T21:40:49+5:302020-04-29T21:49:31+5:30
बॉलिवुड आणि फॅशन फोटोग्राफर व्हायरलभयानी (viralbhayani) यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर इरफान यांचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबरच त्यांनी, अखेरचा श्वास घेण्यापूर्वी इरफान खान यांचे आखेरचे शब्द काय होते, हेही सांगितले आहे.
मुंबई : अभिनेते इरफान खान यांच्या निधनाने केवळ बॉलिवुड नाही, तर संपूर्ण जगातील चाहत्यांना धक्का बसला आहे. इरफान यांच्या जाण्यानं सिलेब्रिटीजपासून ते अगदी सामान्य चाहत्यापर्यंत सर्वावरच शोककळा पसरली आहे. इरफान यांना कोलोन इंफेक्शनमुळे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बॉलिवुड आणि फॅशन फोटोग्राफर व्हायरलभयानी (viralbhayani) यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर इरफान यांचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबरच त्यांनी, अखेरचा श्वास घेण्यापूर्वी इरफान खान यांचे आखेरचे शब्द काय होते, हेही सांगितले आहे.
इरफान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, व्हिडिओ कॉलवरून घेतले आईचे अंत्यदर्शन
असे होते इरफान खान यांचे आखेरचे शब्द -
व्हायरलभयानी (viralbhayani) यांच्या पोस्टनुसार, इरफान यांचे अखेरचे शब्द होते, 'अम्मा मुझे लेने आई हैं' (आई मला घ्यायला आली आहे). या पोस्टवर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही इरफान यांना कधीही विसरणार नाही, असे अनेक चाहते म्हणत आहेत.
बॉलिवुड कलाकारांनीही व्यक्त केले दुःख -
बॉलिवुडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासह सुपरस्टार शाहरुख खान ते सलमान खानपर्यंत, सर्वांनीच इरफान यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. 'माझ्या मित्रा... इंस्पिरेशन आणि आमच्या काळातील सर्वश्रेष्ठ कलाकार, इश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो इरफान भाई... तूझी नेहमीच आठण येत राहील. खरे तर हे आहे, की तू आमच्या आयुष्याचा भाग होतास,' असे ट्विट शाहरुख खान याने केले आहे.
"हृदय जिंकून घेणारे इरफान खानचे डोळे नेहमीच हृदयात राहतील"
My friend...inspiration & the greatest actor of our times. Allah bless your soul Irrfan bhai...will miss you as much as cherish the fact that you were part of our lives.
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 29, 2020
“पैमाना कहे है कोई, मैखाना कहे है दुनिया तेरी आँखों को भी, क्या क्या ना कहे है” Love u pic.twitter.com/yOVoCete4A