भारतात सीबीडी ऑईल कायदेशीर करा...! इरफान खानची पत्नी सुतापाने केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 03:55 PM2020-09-30T15:55:48+5:302020-09-30T15:59:52+5:30

सीबीडी ऑईल बेकायदेशीर आहे, भारतात बॅन आहे.

irrfan khan wife sutapa sikdar demand to legalize cbd oil in india amid ncb drugs investigation in bollywood | भारतात सीबीडी ऑईल कायदेशीर करा...! इरफान खानची पत्नी सुतापाने केली मागणी

भारतात सीबीडी ऑईल कायदेशीर करा...! इरफान खानची पत्नी सुतापाने केली मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देतुम्हाला ठाऊक असेलच की, याच  सीबीडी ऑईलमुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अडकली आहे

सध्या ड्रग्ज प्रकरणाने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. एनसीबीच्या रडारवर अनेक बॉलिवूड कलाकार आहेत. दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांची चौकशीही झालीय. ड्रग्जप्रकरणाने बॉलिवूड सर्वांच्या निशाणावर आले असताना दिवंगत अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापा सिकदर हिने देशात सीबीडी ऑईल कायदेशीर करण्याची मागणी केली आहे.

सुतापाने अलीकडे तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लंडनच्या एका हॉस्पिटलचा फोटो शेअर केला आहे. याच हॉस्पिटलमध्ये इरफानवर कॅन्सर उपचार केले गेले होते. या फोटोसोबत सुतापाने एक इमोशनल मॅसेजही लिहिला. ‘सध्या मी लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये पुन्हा येणे आणि या हॉस्पिटलच्या त्या खोलीला दरवेळी बाहेरून पाहणे, तो इथे असताना मी हेच करायचे,’असे या पोस्टसोबत सुतापाने लिहिले. याच कॅप्शनमध्ये सुतापाने  सीबीडी ऑईल भारतात कायदेशीर करण्याची मागणी केली.

तुम्हाला ठाऊक असेलच की, याच  सीबीडी ऑईलमुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अडकली आहे. सुशांतची एक्स मॅनेजर जया साहा हिची अलीकडे एनसीबीने चौकशी केली. या चौकशीदरम्यान जयाने श्रद्धा कपूरचे नाव घेतले होते. श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन  सीबीडी ऑईल मागवल्याचे तिने म्हटले होते. श्रद्धा कपूरशिवाय तिने सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक मधू मंटेना वर्मा आणि स्वत:साठी सीबीडी ऑईल मागवल्याचा खुलासाही तिने केला होता. यापूर्वी ईडीने रिया चक्रवर्ती आणि जया साहा यांच्यात झालेल्या ड्रग्जबाबतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा खुलासा केला होता. ज्यामध्ये जयाने रियाला सुशांतच्या चहा किंवा कॉफीमध्ये काही थेंब टाकण्याचा सल्ला दिला होता. चहामध्ये 4 थेंब घाल आणि त्याला ते प्यायला दे. 30-40 मिनिटांनी त्याचा परिणाम दिसून येईल, असा मॅसेज जयाने रियाला केला होता. नंतर या दोघींमध्ये सीबीडी आॅईलसंदर्भात ही चर्चा झाल्याचे समोर आले होते.

तर सीबीडी ऑनलाईन मिळतेच कसे? प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्राचा सवाल

श्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा!!

 सीबीडी ऑईल म्हणजे काय? 

कॅनबिडिओल ((CBD) 1940 मध्ये निर्माण करण्यात आलेलं एक phytocannabinoid आहे. हे 113 annabinoids मधील एक आहे. भांग आणि गांज्याच्या झाडांमध्ये याचा वापर केला जातो. 2019 मध्ये सीबीडीवर एक क्लिनिकल रिसर्च करण्यात आला होता. अतिकाळजी, मूव्हमेंट डिसॉर्डर आणि वेदना यासाठी ड्रग्सचा वापर होत असल्याचा रिसर्चमध्ये उल्लेख होता. कॅनबिडिओल वेगवेगळ्या पद्धतीनं शरीरात घेतते जाऊ शकते. धूर, वाफ किंवा एरोजल स्प्रेच्या माध्यामातून किंवा तोंडावाटे घेतले जाते.

  

Web Title: irrfan khan wife sutapa sikdar demand to legalize cbd oil in india amid ncb drugs investigation in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.