इरफान खान बनणार ‘मिस्टर चंपकजी’! पाहा, ‘अंग्रेजी मीडियम’चा फर्स्ट लूक!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:59 PM2019-04-08T12:59:39+5:302019-04-08T13:02:17+5:30
बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा आगामी सिनेमा सध्या चर्चेत आहेत. चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय आणि आता ‘अंग्रेजी मीडियम’चे फर्स्ट लूक समोर आलेय.
बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा आगामी सिनेमा सध्या चर्चेत आहेत. चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय आणि आता ‘अंग्रेजी मीडियम’चे फर्स्ट लूक समोर आलेय. खुद्द इरफानने हा फोटो शेअर केला आहे. ‘जीएमबी 1900 पासून सेवा देतोय. आणखी एक कहाणी...लवकरच सगळ्यांच्या मनोरंजनासाठी येतोय चंपकजीसोबत...’, असे इरफानने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.
या फोटोवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे, इरफान यात चंपकजी हे पात्र साकारताना दिसणार आहे. फोटोत इरफान एका मिठाईच्या दुकानासमोर उभा आहे. म्हणजेच, मिठाईचे दुकान चालवणाºया चंपकजी या मध्यमवर्गीय पात्राची कथा प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहे. तूर्तास राजस्थानमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’चे शूटींग सुरु आहे. चित्रपटाचे दुसरे शेड्यूल लंडनमध्ये शूट होणार आहे. ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफानच्या ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटाचा सीक्वल आहे.
GMB serving since 1900s It’s going to be fun to tell another story #AngreziMedium.
— Irrfan (@irrfank) April 8, 2019
Coming soon, with Mr Champakji...
Aa Raha Hu phir entertain Karne Sabko #ItsTimeToKnowChampakJi#AngreziMedium📸 🕺🏻 pic.twitter.com/mC3IL2UMpf
एंडोक्राईन ट्युमरसारख्या गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर गत ८ महिन्यांपासून इरफान मोठ्या पडद्यापासून दूर होता. या आजाराचे निदान होताच, इरफान उपचारासाठी लंडनला रवाना झाला होता. ८ महिन्यांच्या उपचारानंतर इरफान ठणठणीत होऊन नुकताच भारतात परतला आहे. इरफान शेवटचा ‘कारवां’ चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याच्यासोबत दलकीर सलमान व मिथिला पालकर मुख्य भूमिकेत होते.
Irrfan Khan resumes work... #AngreziMedium shooting begins in #Udaipur today [5 April 2019]... Directed by Homi Adajania... Produced by Dinesh Vijan... Will be shot in #Udaipur and #London... #AngreziMedium is the sequel to the smash hit #HindiMedium, but with a new story. pic.twitter.com/NWVkYfp0Vt
— taran adarsh (@taran_adarsh) April 5, 2019
२०१७ मध्ये इरफानचा ‘हिंदी मीडियम’ प्रदर्शित झाला होता. यात त्याच्या अपोझिट पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती. या चित्रपटाने ३०० कोटींचा बिझनेस करत अनेकांना आश्चयार्ला धक्का दिला होता. चीनमध्येही या चित्रपटाला प्रेक्षकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे लगेच मेकर्सनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरु केली होती. पण याचदरम्यान इरफानला न्युरोएंडोक्राईन ट्युमर कॅन्सरचे निदान झाले होते.