२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 16:09 IST2024-05-28T16:08:31+5:302024-05-28T16:09:41+5:30
अवनीत कौरने गुपचूप उरकला साखरपुडा? फ्लॉन्ट केली रिंग, फोटोंमुळे चर्चेला उधाण

२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
टीव्ही आणि बॉलिवूडमधील चर्चेतील चेहरा म्हणजे अवनीत कौर. २२ वर्षांची अवनीत कौर तिच्या बोल्ड अदांनी नेहमीच चाहत्यांनी घायाळ करत असते. अवनीतचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच अवनीतने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. अवनीतच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अवनीतने तिच्या सोशल मीडियावर हातातील अंगठी दाखवत एक पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात डायमंड रिंग दिसत आहे. हातातील अंगठी फ्लॉन्ट करत अवनीतने पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, "चांगल्या गोष्टींना वेळ लागतोच. आता याबाबत सगळ्यांना सांगण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही". या फोटोंमध्ये अवनीत कौरच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. अवनीतची हे फोटो आणि पोस्ट पाहून तिने गुपचूप साखरपुडा केला का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी तशा कमेंट्सही केल्या आहेत.
"हिचा साखरपुडा झाला का?", "तू नक्की काय सांगणार आहेस?", "हिने खरंच साखरपुडा केला का" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर अनेकांनी हे जाहिरातचं प्रमोशन असल्याचंही कमेंटमध्ये म्हटलं आहे. आता अवनीतने खरंच साखरपुडा केला आहे की तिला आणखी कोणती वेगळी घोषणा करायची आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स' या रिएलिटी शोमधून अवनीतला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक मालिका, सिनेमे आणि रिएलिटी शोमध्ये अवनीत दिसली. 'मेरी माँ', 'तेढे है पर तेरे मेरे है', 'सावित्री', 'एक मुठ्ठी आसमान', 'अलादिन' या मालिकांमध्ये ती झळकली. 'झलक दिखला जा', 'डान्स के सुपरस्टार्स' या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. कंगना रणौतच्या 'टिकू वेड्स शेरू' या सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय 'मर्दानी', दोस्त', 'मर्दानी २' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.