३६व्या वर्षी कंगना रणौत लग्नबंधनात अडकणार! बॉलिवू़ड अभिनेत्याच्या 'त्या' ट्वीटमुळे चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:03 IST2023-09-26T16:02:54+5:302023-09-26T16:03:47+5:30
कंगना रणौत व्यावसायिकाबरोबर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा, बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट व्हायरल

३६व्या वर्षी कंगना रणौत लग्नबंधनात अडकणार! बॉलिवू़ड अभिनेत्याच्या 'त्या' ट्वीटमुळे चर्चा
सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा विवाहबंधनात अडकले. परिणीतीनंतर दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडेच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. आता बॉलिवूड क्वीन कंगना रणौतच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. एका बॉलिवूड अभिनेत्याच्या ट्वीटने कंगणा रणौतच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. 'तनु वेड्स मनू', 'क्वीन', 'फॅशन', 'धाकड', 'मणिकर्णिका' अशा सुपरहिट सिनेमांत काम करून कंगनाने स्वत:ची ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसलेल्या कंगनाने उत्कृष्ट अभिनय आणि अपार मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आता कंगना लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.
बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने(केआरके) कंगनाच्या लग्नाबद्दल एक ट्वीट केलं आहे. "ब्रेकिंग न्यूज : कंगना रणौत डिसेंबर २०२३मध्ये एका व्यावसायिकाबरोबर साखरपुडा करणार आहे. एप्रिल २०२४मध्ये ते विवाहबंधनात अडकतील. तिच्या शुभेच्छा" असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या ट्वीटमुळे सर्वत्र कंगनाच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Breaking News:- Actress Kangana Ranaut is going to get engaged with a businessman in December 2023. They will get married in April 2024! Congratulations to her in advance!
— KRK (@kamaalrkhan) September 24, 2023
दरम्यान, लग्नाच्या चर्चांवर अद्याप कंगना किंवा तिच्या टीमकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कंगना खरंच लग्न करण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.