आलिया भटनंतर कतरिना कैफ आहे प्रेग्नेंट?, लाइमलाइटपासून दूर असल्यामुळे चर्चेला आलं उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 07:10 PM2022-07-12T19:10:38+5:302022-07-12T19:11:20+5:30

Katrina Kaif: अभिनेत्री कतरिना कैफ अचानक गायब झाल्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Is Katrina Kaif pregnant after Alia Bhatt? | आलिया भटनंतर कतरिना कैफ आहे प्रेग्नेंट?, लाइमलाइटपासून दूर असल्यामुळे चर्चेला आलं उधाण

आलिया भटनंतर कतरिना कैफ आहे प्रेग्नेंट?, लाइमलाइटपासून दूर असल्यामुळे चर्चेला आलं उधाण

googlenewsNext

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकामागून एक अभिनेत्री गुड न्यूज शेअर करत आहेत. अलीकडेच सोनम कपूर(Sonam Kapoor) पासून ते आलिया भट(Alia Bhatt)पर्यंत सर्वांनी त्यांच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांशी शेअर केली. दरम्यान, आता कतरिना कैफ(Katrina Kaif)बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हे आम्ही नाही तर कतरिना कैफचे लाखो चाहते म्हणत आहेत. ती आई होणार असल्याचा अंदाज तिचे चाहते बांधत आहेत.

कतरिना कैफ कुठे आहे? गेल्या अनेक दिवसांपासून ती दिसत नाही आहे. अशा परिस्थितीत चाहते तिला मिस करत आहेत. अभिनेत्री अचानक गायब झाल्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप कतरिनाच्या बाजूने कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मे महिन्यात चित्रपट निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत कतरिना शेवटची दिसली होती. इंस्टाग्रामवरही तिने २८ जून रोजी शेवटची पोस्ट केली होती, ज्यामध्ये ती तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती. 


अशा परिस्थितीत कतरिना लाइमलाइटपासून दूर का गेली, असा प्रश्न विचारण्यात आला. इन्स्टाग्रामवर हा प्रश्न येताच चाहत्यांचे डोळे उघडले. बहुतेक चाहत्यांना शंका होती की कदाचित ती प्रेग्नेंट आहे. काही लोक असेही म्हणत आहेत की आलिया भटप्रमाणेच कतरिना देखील तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करण्यासाठी काही खास वेळेची वाट पाहत आहे. १६ जुलैला तिच्या वाढदिवसानिमित्त ती याची घोषणा करू शकते, असेही सांगण्यात आले. कतरिनाने गेल्या डिसेंबरमध्ये अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले होते.


कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे, तर कतरिना कैफ अक्षय कुमारसोबत शेवटची ‘सूर्यवंशी’ या सिनेमात दिसली होती. आता ती तिचा पुढचा सिनेमा ‘फोन भूत’मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. यासोबतच प्रियांका चोप्रा आणि आलिया भटसोबत ती, ‘जी ले जरा’ या सिनेमात दिसणार आहे.

Web Title: Is Katrina Kaif pregnant after Alia Bhatt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.