कतरिना कैफ प्रेग्नंट? अनंत अंबानीच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, चाहत्यांना दिसला बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 10:53 AM2024-07-13T10:53:59+5:302024-07-13T10:54:26+5:30
गेल्या काही दिवसांत कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता कतरिना आणि विकीकडे खरंच गुडन्यूज आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. कतरिना आणि विकीकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. नुकतंच कतरिना आणि विकीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्यातील त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे कतरिना गरोदर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांत कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता कतरिना आणि विकीकडे खरंच गुडन्यूज आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण, अनंत-राधिकाच्या लग्नातील व्हिडिओमुळे कतरिना खरंच गरोदर असल्याचं चाहते म्हणत आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी विकी आणि कतरिनाने ग्लॅमरस लूक केला होता. विकीने शेरवानी परिधान केली होती. तर लाल रंगाच्या साडीत कतरिनाचं सौंदर्य खुलून आलं होतं. अत्यंत साधा लूक करून कतरिनाने या वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली होती.
विकी आणि कतरिनाने अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. या फोटोमध्ये कतरिनाचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. वरिंदर चावलाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विकी-कतरिनाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "ही प्रेग्नंट आहे", "चेहऱ्यावरुन कळतंय ही प्रेग्नंट आहे", "कतरिना गरोदर आहे यात काहीच शंका नाही", "कतरिनाचा बेबी बंप दिसतोय" अशा अनेक कमेंट केल्या आहेत.
विकी आणि कतरिनाने २०२१ मध्ये लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता लग्नाच्या तीन वर्षांनी ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, याबाबत अद्याप विकी किंवा कतरिनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.