कतरिना कैफ गरोदर? लग्नानंतर दीड वर्षांनी विकी कौशल होणार बाबा? अखेर समोर आलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 01:15 PM2023-09-25T13:15:28+5:302023-09-25T13:20:02+5:30
लग्नानंतर दीड वर्षांनी कतरिना कैफ प्रेग्नंन्ट? विकी कौशलमुळे चर्चेला उधाण, जाणून घ्या सत्य
मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसांत आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. तर कित्येक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याचं कारण ठरलंय विकी कौशल. गेल्या काही इव्हेंटमध्ये विकी कौशल एकटाच दिसून आल्याने कतरिना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
कतरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून मीडियापासून दूर असल्याचं दिसून येत आहे. विकी कौशल पत्नी कतरिना व्यतिरिक्तच कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अंबानींच्या घरातील गणपती पूजा असो अथवा लालबागचा राजा दर्शन...या सगळ्या ठिकाणी विकी कौशल एकटाच दिसला. लग्नापासून विकी कौशल आणि कतरिना कैफ प्रत्येक इव्हेंटदरम्यान एकत्र हजेरी लावायचे. परंतु, लग्नानंतर पहिल्यांदाच विकी कौशल एकटाच कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसला. कतरिना कैफ गरोदर असल्यामुळे ती कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याची शंका चाहत्यांना होती. आता यामागचं नेमकं कारण समोर आलं आहे.
परिणीती-राघव यांच्या लग्नात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लावले ठुमके; भगवंत मान यांचा व्हिडिओ व्हायरल
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कतरिना कैफ गरोदर नसून तिच्या कामात सध्या व्यग्र आहे. त्यामुळे ती कार्यक्रमांमध्ये गैरहजर असते. कामात व्यग्र असल्यामुळे विकी कौशल कतरिनाविनाच इव्हेंटला हजेरी लावताना दिसतो.
किरण मानेंनी खरेदी केली मर्सिडीज कार; फोटो शेअर करत म्हणाले, "ही मोठी गोष्ट नाही, पण..."
कतरिना कैफ आणि विकी कौशलने डिसेंबर २०२१मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर आता दीड वर्षांनी ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.