'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनला मिळाली नव्या सिनेमाची ऑफर, मानधन वाचून जाल चक्रावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 17:16 IST2022-01-24T17:13:35+5:302022-01-24T17:16:40+5:30
Allu Arjun Fees : हे तर स्वत: अल्लू अर्जुनने मान्य केलं आहे की, 'पुष्पा' चा हिंदी वर्जन रिलीज झाल्यानंतर त्याला बॉलिवूडमधूनही ऑफर येत आहेत. अशातच तो आता त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे.

'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनला मिळाली नव्या सिनेमाची ऑफर, मानधन वाचून जाल चक्रावून
अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या त्याच्या 'पुष्पा' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. सुकुमार दिग्दर्शित या सिनेमामुळे अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे आणि आता त्याचे फॉलोअर्सही वाढत आहे. सोबतच तो आता दिग्दर्शकांचा फेवरेट अभिनेता बनला आहे. हे तर स्वत: अल्लू अर्जुनने मान्य केलं आहे की, 'पुष्पा' चा हिंदी वर्जन रिलीज झाल्यानंतर त्याला बॉलिवूडमधूनही ऑफर येत आहेत. अशातच तो आता त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे.
एटली करणार सिनेमाचं दिग्दर्शन
मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन त्याचा आगामी सिनेमा दिग्दर्शक एटलीसोबत करणार आहे. सध्या तमिळ दिग्दर्शक एटली शाहरूख खानच्या एका सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. या सिनेमाचं टायटल अजून ठरलं नाही. हा सिनेमा पूर्ण झाल्यावर एटली अल्लू अर्जुनच्या सिनेमावर काम करेल. मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही सांगितलं जात आहे की, अल्लू अर्जुनने एटलीने दिलेली कथा आधीच ऐकली आहे आणि त्याला कथा आवडलीही आहे. फक्त आता प्रोजेक्ट साइन करण्याची वाट बघितली जात आहे.
किती कोटीची मिळाली ऑफर
MensXP नुसार, अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा देखील एक पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. या सिनेमासाठी निर्मात्यांनी अल्लू अर्जुनला १०० कोटी रूपयांची ऑफर दिली आहे. या सिनेमाची निर्मिती लायका प्रॉडक्शन द्वारे केलं जाणार आहे. या कंपनीकडून आधी २.०, कथी आणि दरबार सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. पण अजून याबाबत काहीच अधिकृत घोषणा झालेली नाही.
१७ डिसेंबरला रिलीज झालेल्या 'पुष्पा - द राइज' ने बॉक्स ऑफिसवर ३४० कोटी रूपयांपेक्षा अधिकची कमाई केली आहे. या सिनेमाने ओटीटीवरही धुमाकूळ घातला आहे. इतकंच नाही तर तामिळनाडूमधील ५० थिएटर्समध्ये हा सिनेमा पुन्हा लावण्यात आला आहे. यात रश्मिका मंदांना, अनसूया भारद्वाज यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हे पण वाचा :
'पुष्पा' मध्ये दाखवलेल्या रक्त चंदनासाठी लोकं आपला जीव धोक्यात का घालतात?