'गदर २'मधील सकीना १८ वर्ष लहान निर्वाण बिर्लासोबत आहे रिलेशनशीपमध्ये?, व्हायरल फोटोवर बिझनेसमन म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:04 IST2025-01-13T18:04:23+5:302025-01-13T18:04:50+5:30

Ameesha Patel : 'गदर २' अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. तिचे वैयक्तिक आयुष्य सतत चर्चेत असते.

Is Sakina from 'Gadar 2' aka Ameesha Patel in a relationship with Nirvana Birla, who is 18 years younger?, businessman said on viral photo... | 'गदर २'मधील सकीना १८ वर्ष लहान निर्वाण बिर्लासोबत आहे रिलेशनशीपमध्ये?, व्हायरल फोटोवर बिझनेसमन म्हणाला...

'गदर २'मधील सकीना १८ वर्ष लहान निर्वाण बिर्लासोबत आहे रिलेशनशीपमध्ये?, व्हायरल फोटोवर बिझनेसमन म्हणाला...

'गदर २' (Gadar 2 Movie) अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. तिचे वैयक्तिक आयुष्य सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी बिझनेसमन निर्वाण बिर्लासोबत तिचे अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. एक फोटोही व्हायरल झाला होता ज्यामध्ये निर्वाण तिला मिठी मारताना दिसत होता. फोटोत दोघेही खूप खुश दिसत होते. आता या अफेअरच्या अफवांवर निर्वाणने प्रतिक्रिया दिली आहे.

फ्री प्रेस जर्नलशी बोलताना निर्वाणने अभिनेत्रीसोबतच्या त्याच्या नात्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. तो अमिषाला डेट करत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. निर्वाणने सांगितले की, अमिषा त्याची फॅमिली फ्रेंड आहे. अमिषा त्याच्या वडिलांना खूप पूर्वीपासून ओळखते. व्हायरल झालेल्या फोटोबाबत त्याने सांगितले की ते त्यांच्या म्युझिक अल्बमच्या शूटसाठी दुबईला गेले होते, ज्यामध्ये अमीषा पटेल दिसली आहे.

कोण आहे निर्वाण बिर्ला?

निर्वाण बिर्ला हा उद्योगपती यशवर्धन बिर्ला यांचा मुलगा आहे. निर्वाण बिर्ला हे ओपन माइंड्स एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संस्थापक आहेत. निर्वाण ३१ वर्षांचा तर अमिषा ४९ वर्षांची आहे. अमिषाच्या अफेअरबद्दल बोलायचे झाले तर तिचे नाव विवाहित दिग्दर्शक विक्रम भट्टसोबतही जोडले गेले आहे. असे सांगितले जाते की ते ५ वर्षे डेट करत होते आणि नंतर वेगळे झाले होते. नंतर अमिषाने ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले होते.

वर्कफ्रंट
अमिषाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तिने २००० मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'कहो ना प्यार है' या चित्रपटात ती दिसली होती. हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. अमिषा पटेल रातोरात स्टार झाली होती. तिने गदर: एक प्रेम कथा आणि ये है जलवा सारखे चित्रपट केले आहेत. गदर २ मध्ये ती सनी देओलची पत्नी सकिना हिच्या भूमिकेत होती. गदर २ मध्येही ती सकीनाच्या भूमिकेत दिसली होती.

Web Title: Is Sakina from 'Gadar 2' aka Ameesha Patel in a relationship with Nirvana Birla, who is 18 years younger?, businessman said on viral photo...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.