ईशा अंबानीच्या साखरपुड्याला बॉलिवूड कलाकारांची मंदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 16:06 IST2018-09-22T16:04:58+5:302018-09-22T16:06:34+5:30
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा पिरामल उद्योग समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी साखरपुडा होत आहे. परदेशात जवळपास तीन दिवस हा साखपुड्याचा समारंभ आणि त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पार पडणार आहेत

ईशा अंबानीच्या साखरपुड्याला बॉलिवूड कलाकारांची मंदियाळी
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा पिरामल उद्योग समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी साखरपुडा होत आहे. परदेशात जवळपास तीन दिवस हा साखपुड्याचा समारंभ आणि त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पार पडणार आहेत. या साखरपुड्यासाठी बॉलिवूड कलाकारांची इटलीत उपस्थिती पाहायला मिळाली. इटलीतले लेक कोमो हे स्थळ साखरपुड्यासाठी निवडण्यात आले आहे. स्वर्गाहून सुंदर जागा अशी प्रशंसा लेक कोमो परिसराची नेहमीच केली जाते. याच ठिकाणी दीपिका आणि रणबीर ही बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडीदेखील विवाह बंधनात अडकणार आहे.
या साखरपुड्यासाठी अनिल कपूर, मनिष मल्होत्रा, जान्हवी कपूर. प्रियांका चोप्रा, सोनम कपूर अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. या बॉलिवूड कलाकारांमध्ये प्रियांका चोप्रा आणि तिचा होणारा नवरा निक जोनास याने सगळ्यांचे लक्ष वेधले.
प्रियांका आणि निकने पारंपारिक भारतीय पेहरावात साखरपुड्यासाठी उपस्थिती लावली. या नव्या जोडप्याचे भारतीय पेहरावातले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तर काळ्या रंगाच्या गाऊनमधली जान्हवी कपूरही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. देशातील मोठा उद्योग समूह असलेल्या पिरामल इंटरप्रायजेसचे अजय पिरामल यांचा मुलगा आनंद याच्याबरोबर ईशाचा विवाह होणार आहे. आनंद आणि ईशा जुने मित्र आहेत.