Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या लग्नाला अमिताभ बच्चन यांच्यासमवेत पोहचले हे सेलेब्रिटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 19:20 IST2018-12-12T19:19:38+5:302018-12-12T19:20:24+5:30
प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचे आनंद पीरामल यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे.

Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या लग्नाला अमिताभ बच्चन यांच्यासमवेत पोहचले हे सेलेब्रिटी
प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचे आनंद पीरामल यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. तिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटी अंबानींचे घर अँटीलियामध्ये पोहोचत आहेत.
अमिताभ बच्चन मुलगी श्वेता आणि पत्नी जया बच्चनसोबत लग्नस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी अमिताभ व्हाइट ब्राऊन कलरचा कुर्ता आणि पायजामात दिसले. त्यांनी ड्रेससोबतच गळ्यात मोठ्या मोतींची माळ घालतली आहे. तर श्वेता डार्क राणी कलरच्या साडीत दिसली. यांच्याव्यतिरिक्त आमिर खान पत्नी किरण रावसोबत पोहोचला आहे. आमिरने रॉयल ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाइट कलरचा पायजामा घातला आहे.
तसेच अभिषेक बच्चन ऐश्वर्या व आराध्यासोबत या विवाहसोहळ्यात पोहचले आहेत.
नुकतेच लग्नबेडीत अडकलेले प्रियांका चोप्रा व निक जोनास हे जोडपे देखील येथे पोहचले असून प्रियांकाने पीच रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
ईशाच्या लग्नात सर्वप्रथम तिची बॉलिवूडमधील बेस्ट फ्रेंड अभिनेत्री कियारा आडवाणी पोहोचली. कियारा क्रीम कलरच्या आऊटफिटमध्ये सुंदर दिसली. जया बच्चन, नव्या नवेली नंदा, विधु विनोद चोप्रा, अनुपमा चोप्रा, मनीष मल्होत्रा, वैभवी मर्चेंटसुद्धा लग्नस्थळी दाखल झाले आहेत.