ईशा देओल म्हणते, लो चली मैं अपने देवर की बारात ले के, असे लावले दीराच्या लग्नात ठुमके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 09:47 AM2018-03-15T09:47:28+5:302018-03-16T17:25:40+5:30

ईशा देओल आपल्या दीराचे लग्न एन्जॉय करताना दिसली. लग्न सोहळ्या दरम्यानचे फोटो याआधी ईशाने शेअर देखील केले होता. आता या सोहळ्यातील व्हिडिओसमोर आला आहे ज्यात ईशा नवऱ्यामुलासोबत डान्स करताना दिसते आहे.

Isha Deol says, 'Take a walk, take my brother's wedding procession | ईशा देओल म्हणते, लो चली मैं अपने देवर की बारात ले के, असे लावले दीराच्या लग्नात ठुमके

ईशा देओल म्हणते, लो चली मैं अपने देवर की बारात ले के, असे लावले दीराच्या लग्नात ठुमके

googlenewsNext
ा देओल आपल्या दीराचे लग्न एन्जॉय करताना दिसली. लग्न सोहळ्या दरम्यानचे फोटो याआधी ईशाने शेअर देखील केले होता. आता या सोहळ्यातील व्हिडिओसमोर आला आहे ज्यात ईशा नवऱ्यामुलासोबत डान्स करताना दिसते आहे. हलक्या गुलाबी रंगाचा साडीमध्ये आणि भरगच्च ज्वेलरीमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. या फोटोत ती तिच्या जाऊबाई तनवी गुप्तासोबत दिसते आहे. तनवी गुप्ताने मानिव तखतानीसोबत लग्न केले आहे. 
 
ईशा देओलच्या दीरच्या लग्नात तिची आई हेमा मालिनीसुद्धा सहभागी झाल्या होत्या. लग्नाच्या आधी झालेल्या कॉकटेल पार्टीमध्ये सुद्धा माय-लेकीची जोडी वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसली होती. 
ईशा देओल एका हिंदी शॉर्ट फिल्ममधून कमबॅक करणार आहे. केकवॉक असे त्या शॉर्ट फिल्मचे नाव आहे. याचे दिग्दर्शन राम कमल मुखर्जी करणार आहे. राम कमल यांनी हेमा मालिनी यांची बायॉग्राफी लिखिली आहे. ईशा या चित्रपटात एका शेफची भूमिका साकारणार आहे.याचित्रपटाबाबत नवभारत टाईम्सशी बोलताना ईशा म्हणाली, राम कमल यांच्या डोक्यात हा विचार तेव्हा आला ज्यावेळी ते माझ्या आईच्या आयुष्यावर आधारित पुस्तकासाठी माझा इंटरव्हु करत होते. तर राम कमल या चित्रपटाविषयी म्हणाला की, ईशानेच मला या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. चित्रपटाची कथा आणि स्क्रिनप्ले सुद्धा राम कमलच लिहिणार आहे.  



ALSO READ :  चित्रपटात कमबॅक करण्यासाठी ईशा देओल घेतेय ‘या’ अभिनेत्रीकडून धडे!!

ईशाने कोई मेरे दिल से पूछे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘एलओसी कारगिल, युवा, धुम, आँखे आणि कॅश यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ईशा गेल्या दोन्ही ‘रोडीज एक्स-२’मध्ये जजच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. याव्यतिरिक्त ती २०१५ मध्ये आलेल्या ‘किल देम यंग’ नावाच्या ड्रामा फिल्ममध्ये बघावयास मिळाली होती. तसेच २०११ मध्ये मम्मी हेमामालिनी यांच्या ‘टेल मी ओ खुदा’ या चित्रपटातही झळकली होती. २०१२च्या फेब्रुवारीमध्ये ईशाने उद्योगपती भरत तख्तानीसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यातच जूनमध्ये त्या दोघांनी लग्न केले होते.

Web Title: Isha Deol says, 'Take a walk, take my brother's wedding procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.