घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ईशा देओलच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणते- कधी कधी काही गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 04:59 PM2024-01-18T16:59:34+5:302024-01-18T17:01:18+5:30

ईशा आणि भरतच्या नात्यात दुरावा आल्याच्याही चर्चा आहेत. अशातच आता ईशाच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. 

isha deol shared criptic post amid divorce rumors with husband bharat takhtani | घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ईशा देओलच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणते- कधी कधी काही गोष्टी...

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ईशा देओलच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणते- कधी कधी काही गोष्टी...

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी असलेली ईशा घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. ईशा आणि पती भरत तख्तानी वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेक दिवसांपासून ईशाने पतीबरोबर सोशल मीडियावर एकही पोस्ट केलेली नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये बिनसल्याचं म्हटलं जात आहे. त्याबरोबरच ईशा आणि भरतच्या नात्यात दुरावा आल्याच्याही चर्चा आहेत. अशातच आता ईशाच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. 

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ईशाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ईशाच्या पहिल्या सिनेमातील एका गाण्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेअर करत ईशाने क्रिप्टिक पोस्ट लिहिली आहे. "कधी कधी तुम्हाला काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आणि फक्त मनसोक्त डान्स केला पाहिजे. १८ वर्षांची मी आणि माझा पहिला चित्रपट" असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

ईशा किंवा भरतने घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.पण, त्यांच्या नात्याबद्दल निकटवर्तियांनी प्रतिक्रिया दिली होती. "ईशा आणि भरत वेगळे होत असल्याच्या चर्चा खोट्या आहेत. जून २०२३ मध्ये दोघांनी लग्नाचा ११वा वाढदिवस साजरा केला. सोबतच ईशाने पतीसोबतचा रोमँटिक मोनोक्रोम फोटोही शेअर केला," असं ते म्हणाले.  ईशा आणि भरत तख्तानी २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना राध्या आणि मिराया या मुली आहेत. 

Web Title: isha deol shared criptic post amid divorce rumors with husband bharat takhtani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.