​सेमी न्यूड फोटोंवर बोलली इशा गुप्ता; म्हणे, माझ्या फोटोत ‘अश्लिल’ असे काहीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 05:00 AM2017-08-14T05:00:55+5:302017-08-14T10:31:48+5:30

इशा गुप्ता सध्या भलतीच चर्चेत आहे. सेमी-न्यूड फोटोशूट करून इशा चर्चेत आली. विशेष म्हणजे, बयेने हे सगळे फोटो सोशल ...

Isha Gupta speaks on semi-nude photos; That said, there is nothing in my photo! | ​सेमी न्यूड फोटोंवर बोलली इशा गुप्ता; म्हणे, माझ्या फोटोत ‘अश्लिल’ असे काहीच नाही!

​सेमी न्यूड फोटोंवर बोलली इशा गुप्ता; म्हणे, माझ्या फोटोत ‘अश्लिल’ असे काहीच नाही!

googlenewsNext
ा गुप्ता सध्या भलतीच चर्चेत आहे. सेमी-न्यूड फोटोशूट करून इशा चर्चेत आली. विशेष म्हणजे, बयेने हे सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे टॉपलेस फोटो अपलोड करून इशा गुप्ता ट्रोलिंगची बळी ठरली. सोशल साईटवर अनेक युजर्सनी इशाच्या या फोटोंवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.‘क्या आपके पापाने इन तस्वीरों को देखा है?’ इथपर्यंत युजर्सने इशाला विचारून टाकले होते. पण युजर्सच्या या संतापाचा इशावर कुठलाच परिणाम झाला नाही.  उलट स्वत:चे त्याहीपेक्षाअतिशय बोल्ड फोटो पोस्ट करून इशाने ट्रोल करणा-यांना खरमरीत उत्तर दिले. केवळ एवढेच नाही तर, यानंतर स्वत:चा न्यूड फोटो शेअर करून इंटरनेटवर जणू आग लावली. अर्थात हे करताना तिने ट्रोलिंग पासून वाचण्याची सोय केली. होय, या फोटोंवर इशाने एन्ट्री बंद केली. म्हणजेच, कमेंट सेक्शन ब्लॉक केले. 





ALSO READ :  ‘टॉपलेस’ झाली इशा गुप्ता ; ट्रोल करणा-यांना ‘नो एन्ट्री’!!

इतका सारा खटाटोप करण्याचा आणि त्यासाठी लोकांचा संताप ओढवून घेण्याची गरज काय? असा प्रश्न तुम्हाला इशाला विचारावासा वाटेल. नेमका हाच प्रश्न इशाला एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर इशाचे उत्तर अगदी बिनधास्त होते. मी कुठलीही मर्यादा लांघलेली नाही. स्वत:चे शरीर दाखवणे यात काय गैर? असा उलट सवाल तिने केला. आपल्या देशात कायम बायकांना दोषी ठरवले जाते. मुलगी जन्माला आली तरी बाई दोषी. बलात्कार झाला तरी तीच दोषी. त्यामुळे स्वत:चे सेमी न्यूड फोटो शेअर केल्यावर मलाही समाजाच्या रोषाला बळी पडावे लागेल, हे मला ठाऊक होते. शेवटी रिकामटेकड्या आणि शून्य अस्तित्व असलेल्यांसाठी सेलिब्रिटींवर टीका करणे अगदी सोपे आहे. मी मॉडेलिंग करायचे तेव्हाही मी असे फोटोशूट केले आहे. त्यावेळीही टॉपलेस आणि न्यूड झालेयं. तेव्हा मला कुणी विचारले नाही आणि शेवटी मला विचारणारे, माझ्या फोटोंवरून रान माजवणारे हे लोक कोण? हे माझे शरीर आहे आणि सौंदर्यदृष्टीने त्याचे फोटो काढले गेलेत एवढेच. एक पुसटशी रेषा आहे. ती ओलांडली की, तुम्ही ‘अश्लिल’ दिसता. पण माझ्या फोटोत अश्लिलता आहे, असे कुणीही म्हणू शकत नाही. मला द्वेषापेक्षा प्रेम मिळाले. पण माझ्यामते, विस्मरणात जाण्यापेक्षा द्वेषाचे कारण ठरणे कधीही चांगले. सध्या मी सगळ्यात मी योग्य फिगरमध्ये आहे. आता नाही तर मग कधी? असे तिने म्हटले.
 

Web Title: Isha Gupta speaks on semi-nude photos; That said, there is nothing in my photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.