"तीन पिढ्या, एक पवित्र क्षण" ईशा कोप्पिकरचं आई अन् मुलीसोबत पवित्र स्नान, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:35 IST2025-02-11T14:54:54+5:302025-02-11T15:35:28+5:30
लोकप्रिय अभिनेत्री प्रयागराजमध्ये पोहोचली आहे. यासंदर्भात तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

"तीन पिढ्या, एक पवित्र क्षण" ईशा कोप्पिकरचं आई अन् मुलीसोबत पवित्र स्नान, पाहा Video
Mahakumbh Mela 2025: उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सोहळा (Mahakumbhmela 2025) सुरु आहे. यंदाचा हा कुंभमेळा आणखी खास आहे, कारण तो तब्बल १४४ वर्षांनी आला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातून लोक महाकुंभमध्ये येताना दिसत आहेत. अनेक सिनेकलाकारही या कुंभमेळ्यात कुंभस्नान करताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये नाव गाजवलेली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पिकर (Isha Koppikar in Mahakumbhmela 2025) ही नुकतंच प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात पोहचली. ईशानं तिला आलेला विलक्षण अनुभव सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला.
ईशानं इन्स्टाग्रामवर महाकुंभतील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती महाकुंभस्नान करताना दिसत आहे. ईशानं आपली मुलगी, आई आणि वडिलांसोबत हा सोहळा अनुभवला आहे. "तीन पिढ्या, एक पवित्र क्षण. कुंभमेळ्याच्या दिव्य पाण्यात डुबकी घेतली, श्रद्धा, परंपरा आणि आशीर्वाद स्वीकारला", असं व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शन दिलं आहे. ईशाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतूक केलं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओ वर कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.
ईशा कोप्पिकरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. १९९५ मध्ये ईशानं मिस इंडिया स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावी केलं होतं. २००९ मध्ये ईशाने बिझनेसमन टिमी नारंगशी लग्न केले. पण, नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना रियाना नावाची मुलगीही आहे. आता ती एकटी लेकीचा सांभाळ करत आहे. ईशानं तेलगू, तमिळ, मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलेलं आहे. "फिजा', 'प्यार इश्क और मोहब्बत', 'कंपनी', 'कांटे', 'डॉन' आणि 'क्या कुल हैं हम' या सिनेमांमध्ये ईशा झळकलेली आहे. तसेच ईशानं अनेक सिनेमांमध्ये आयटम साँग केले. त्यातही तिचं 'खल्लास' आजही लोकप्रिय आहे. तिला 'खल्लास' गर्ल म्हणूनही ओळखलं जातं.