डिसलाइक्सचा ‘सिलसिला’ सुरुच! ‘सडक 2’नंतर ‘खाली पीली’च्या टीजरला 6 लाखांवर लोकांची नापसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 12:26 PM2020-08-25T12:26:46+5:302020-08-25T12:27:21+5:30
ट्विटर ट्रेंड झाला #BoycottKhaaliPeeli
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजमच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. यानंतर काही ‘नेपोकिड्स’ जबरदस्त ट्रोल होत आहेत. केवळ इतकेच नाही तर त्यांच्या आगामी सिनेमांचे ट्रेलर आणि टीजरला डिसलाईक करून युजर्स आपला संताप व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी आलिया भटच्या ‘सडक 2’ या सिनेमाच्या ट्रेलरवर युजर्सनी डिसलाईक्सचा भडीमार केला होता. इतका की, हा ट्रेलर जगातील सर्वाधिक नापसंत केलेला ट्रेलर ठरला होता. आता लोकांनी ‘खाली पीली’ या सिनेमाच्या टीजरला सुद्धा असेच लक्ष्य केल्याचे दिसतेय.
24 ऑगस्टला ‘खाली पीली’ या आगामी सिनेमाचा टीजर रिलीज झाला होता. इशान खट्टर आणि अनन्या पांडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. अनन्या या सिनेमात असल्याने या सिनेमाच्या टीजरलाही घराणेशाहीच्या वादाचा फटका बसल्याचे पाहायला मिळतेय. आत्तापर्यंत युट्यूबवर 21 लाखांवर लोकांनी ‘खाली पीली’चा टीजर पाहिला. 68 हजार लोकांनी या टीजरला लाइक्स केले आणि 6 लाख 59 हजार लोकांनी या टीजरला डिसलाइक्स केले.
ट्रेंड झाला #BoycottKhaaliPeeli
I don't felt anything better in this Movie! I ll rate it 0.5/5 . 🙏#KhaaliPeeli
— Avinash~Sidnaaz❤️🤍 (@DilBoleSidNaaz) August 24, 2020
boycott #KhaaliPeeli#BoycottNepotism
— Vibrant Vibes (@VVibes90) August 24, 2020
केवळ युट्यूबवरच नाही तर ट्विटरवरही इशान खट्टर व अनन्या पांडेच्या ‘खाली पीली’च्या टीजरला संतापाचा सामना करावा लागत आहे. सध्या ट्विटरवर #BoycottKhaaliPeeli हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. यावरचे अनेक मीम्सही आणि निगेटीव्ह कमेंट्सही बघायला मिळत आहेत. माझ्याकडे हा सिनेमा पाहण्यासाठी वेळ नाही. मी आत्ताच या सिनेमाला 0.5 स्टार देतो, असे एका युजरने लिहिले आहे. तर अन्य एका युजरनेही आम्ही हा सिनेमा पाहणार नाही, अशी कमेंट केली आहे.
टीजरमध्ये काय?
एका मुलगा आणि मुलगी टॅक्सीतून पळून जाण्यापासून या सिनेमाची कथा सुरू होते. टीझरच्या सुरूवातीलाच ईशानच्या पद्धतीने एन्ट्री होते तेव्हाच त्याची भूमिका टपोरी टाइप असल्याचे कळते. त्यानंतर टीझरमध्ये एन्ट्री होते सुपर हॉट अनन्या पांडेची. दोघेही काहीतरी गुन्हा करून पोलिसांपासून लपत पळत फिरत आहेत. या क्रिकेटर्स सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या नावाचाही एका डायलॉगमध्ये मजेदार उल्लेख आहे.