ईशान खट्टर व जान्हवी कपूर पुन्हा एकत्र झळकणार नाहीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 21:00 IST2019-02-25T21:00:00+5:302019-02-25T21:00:00+5:30
अभिनेता ईशान खट्टर व अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'धडक' चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला.

ईशान खट्टर व जान्हवी कपूर पुन्हा एकत्र झळकणार नाहीत?
अभिनेता ईशान खट्टर व अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'धडक' चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. हा चित्रपट मराठी सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे. या रिमेकलाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने शंभर कोटींचा पल्ला गाठला आहे. या चित्रपटातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ईशानचा हा दुसरा सिनेमा आहे.
धडकच्या चित्रीकरणावेळी जान्हवी आणि ईशान दोघांमध्ये खूपच चांगले बॉंडिंग निर्माण झाले होते. त्यांच्यातली केमिस्ट्री बघून आणखी एखाद्या सिनेमात त्यांना एकत्र घेतले जाईल, असा अंदाज वर्तवला जाऊ लागला होता. त्या अंदाजानुसार या जोडीकडे असाच आणखी एक सिनेमा आलाही होता. मात्र दोघांनी हा सिनेमा नाकारला आहे, असे समजते आहे. कारण त्यांना आता एकमेकांच्याबरोबर काम करायचे नाही आहे. त्या दोघांचे अफेअर सुरु असल्याची अफवा पसरली होती. त्याच कारणाने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.
हे दोघेही एकत्र जिमला जायचे. बहुतेक ठिकाणी एकत्रच जायचे. त्यामुळे मीडियाने त्यांच्याबाबत चर्चा करायला सुरुवात केली होती. या अफवेला हे दोघेही वैतागले होते. आपली ओळख आपल्या कामावरून केली जावी, म्हणून त्यांनी कामावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले आहे. त्यासाठी एकत्र कामाचा मोठा सिनेमा नाकारला आणि स्वतंत्र काम करायला सुरुवात केली आहे.
आता ते दोघे एकत्र काम करणार की नाही हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.