ईशान खट्टर दिसणार ह्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 17:08 IST2019-01-03T17:05:01+5:302019-01-03T17:08:56+5:30
ईशान खट्टर दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट 'गीथा गोविन्दम'च्या हिंदी रिमेकसाठी विचारण्यात आले आहे.

ईशान खट्टर दिसणार ह्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खट्टरने 'बियॉन्ड द क्लाउड्स' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'बियॉन्ड द क्लाउड्स'च्या ट्रेलरवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे हा चित्रपट पूर्णपणे मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. भाऊ आणि बहिणीची मनाला भिडणारी कथा चित्रपटात दाखविण्यात आली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तो 'धडक' चित्रपटात झळकला आणि या सिनेमातील त्याच्या अभिनय कौशल्य व चॉकलेट बॉय इमेजमधून प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती.
आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईशान खट्टर दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट 'गीथा गोविन्दम'च्या हिंदी रिमेकसाठी विचारण्यात आले आहे.
एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, 'गीथा गोविन्दम' हा दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट लवकरच हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि यात ईशान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साऊथमध्ये बनलेल्या 'गीथा गोविन्दम'मध्ये मुख्य भूमिका विजय देवरकोंडाने केली होती व या चित्रपटाचे दिग्दर्शन परशुरामने केले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा हिंदीत बनणार असून या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचा शोध सुरू आहे. या चित्रपटात ईशानसोबत कोण अभिनेत्री असणार हे अद्याप समजू शकलेले नाही.
जर ईशानने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला तर त्याला विजयच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.