एक्स-गर्लफ्रेन्डमुळे ईशान खट्टरने गमावला ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 06:19 PM2018-07-24T18:19:00+5:302018-07-25T06:50:59+5:30

सध्या ‘धडक’मुळे ईशान चर्चेत आहे. याशिवाय आणखी एक बातमी त्याच्याबद्दलच्या चर्चेला कारणीभूत ठरली आहे.

ishaan khatter not cast in student of the year2 because ex-girlfriend | एक्स-गर्लफ्रेन्डमुळे ईशान खट्टरने गमावला ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’!!

एक्स-गर्लफ्रेन्डमुळे ईशान खट्टरने गमावला ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’!!

googlenewsNext

‘धडक’मुळे जान्हवी कपूरला जितकी लोकप्रियता मिळाली, तितकी ईशान खट्टरला नाही. याचे कारण म्हणजे, ‘दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लेक’ हे जान्हवीभोवती असलेले वलय. खरे सांगायचे तर ‘धडक’मध्ये अभिनयाच्याबाबतीत जान्हवीपेक्षा ईशान उजवा ठरला. समीक्षकांनीही त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. पण असे असूनही लोकांनी जान्हवीला डोक्यावर घेतले. असो, सांगायचा मुद्दा हा की, सध्या ‘धडक’मुळे ईशान चर्चेत आहे. याशिवाय आणखी एक बातमी त्याच्याबद्दलच्या चर्चेला कारणीभूत ठरली आहे. होय, ‘धडक’नंतर ईशान ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये दिसला असता. पण आता तसे होणे नाही. केवळ एक्स-गर्लफ्रेन्डमुळे ईशानला हा चित्रपट गमवावा लागला.

होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार,‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असणाऱ्या तारा सुतारियामुळे करण जोहरने ईशानला या चित्रपटातून बाहेर केले. कारण ईशान व तारा कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. साहजिकच चित्रपटावर या तुटलेल्या नात्याचे साईड इफेक्ट करणला नको होते. त्यामुळे करणने ईशानला चित्रपटातून बाहेर केले.
‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे लीड रोलमध्ये आहेत. या तिघांमध्ये तारा ही करणसाठी विशेष आहे. ताराने लंडनच्या डान्स अ‍ॅकेडमीत क्लासिक बॅले, मॉडर्न डान्स, लॅटिन अमेरिकन डान्स शिकला आहे. ती एक प्रोफेशनल सिंगरही आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून ती गाते आहे. सध्या तारा दिवंगत अभिनेते विनोद मेहराचा मुलगा रोहन मेहरा याला डेट करत असल्याचे कळतेय.

 

Web Title: ishaan khatter not cast in student of the year2 because ex-girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.