‘संजू’साठी कठीण होते ‘हे’ काम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 09:26 AM2018-06-13T09:26:12+5:302018-06-13T14:56:12+5:30

बॉलिवूडचा चार्मिंग बॉय रणबीर कपूरचा ‘संजू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात रणबीर कपूर अभिनेता संजय ...

It is difficult for 'Sanju' to work! | ‘संजू’साठी कठीण होते ‘हे’ काम!!

‘संजू’साठी कठीण होते ‘हे’ काम!!

googlenewsNext
लिवूडचा चार्मिंग बॉय रणबीर कपूरचा ‘संजू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात रणबीर कपूर अभिनेता संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटातील रणबीरचा लूक संजयशी किती मिळताजुळता आहे, याची झलक आपण चित्रपटाच्या ट्रेलर व टीजरमध्ये बघितली आहेच. पण रणबीरसाठी हे दिसते तितके सोपे खचितचं नव्हते. स्वत:ला संजयच्या व्यक्तिरेखेत फिट बसवण्यासाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली. अगदी संजयचे हावभाव, त्याची चाल, त्याच्या वागण्यातील अनेक बारकावे टीपण्यापासून तर त्याच्यासारखी शरीरयष्टी बनवण्यापर्यंत अनेक गोष्टी रणबीरने केल्यात. या भूमिकेसाठी रणबीरला एकदा वजन घटवावे लागले तर एकदा वाढवावे लागले. होय, रणबीरने सर्वातआधी १० किलो वजन कमी केले. संजयच्या आयुष्याचा सुरूवातीचा टप्पा शूट करण्यासाठी त्याला हे वजन कमी करावे लागले. यानंतर संजयच्या आयुष्याचा दुसरा टप्पा चित्रीत करण्यासाठी रणबीरने पुन्हा १५ किलो वजन वाढवले. साहजिकचं रणबीरची ही मेहनत कामी आली, असे म्हणायला हरकत नाही. ‘संजू’चा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हालाही त्याची प्रचिती येईल.

ALSO READ : ‘भूमी’साठी केले; पण ‘संजू’साठी नाही रणबीर कपूर व संजय दत्तजवळ वेळ!!

रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘संजू’ नावाचा हा चित्रपट येत्या २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तूर्तास या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.संजय दत्तचे नशेच्या आहारी गेल्यानंतरचे आयुष्य, कारागृहातील दिवस, नातेवाइकांचा अबोला, दहशतवादी अशा काही घटना या चित्रपटात  दाखविल्या जातील, ज्या तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. या बायोपिकमध्ये अभिनेता  मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर आदी कलाकार आहेत. 

Web Title: It is difficult for 'Sanju' to work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.