पहिल्याच सिनेमातून स्टार झालेल्या या अभिनेत्रींना आता काम मिळणं झालंय कठीण, जाणून घ्या कोण आहेत त्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 02:42 PM2021-08-30T14:42:54+5:302021-08-30T14:43:53+5:30

अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांना पहिल्या चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली मात्र त्यानंतर त्यांना काम मिळणे कठीण झाले आहे.

It is difficult for these actresses who got star from their first movie to get a job now, find out who they are. | पहिल्याच सिनेमातून स्टार झालेल्या या अभिनेत्रींना आता काम मिळणं झालंय कठीण, जाणून घ्या कोण आहेत त्या?

पहिल्याच सिनेमातून स्टार झालेल्या या अभिनेत्रींना आता काम मिळणं झालंय कठीण, जाणून घ्या कोण आहेत त्या?

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत जे पहिल्याच चित्रपटातून सुपरस्टार झाले. त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. मात्र त्यानंतर त्यांना काम मिळणेही अवघड झाले. यातील काही जण कालांतराने सिनेइंडस्ट्रीतून गायब झाले. अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांना पहिल्या चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली मात्र त्यानंतर त्यांना काम मिळणे कठीण झाले आहे.

मोहब्बतें या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री शमिता शेट्टीने एकमेव यशस्वी चित्रपटात काम केले आहे. यानंतर अनेक चित्रपटानंतरही तिला फारशी ओळख मिळाली नाही.शमिता खतरों के खिलाडी या रिऍलिटी शोमध्ये दिसली आहे. सध्या ती बिग बॉस ओटीटीमध्ये पहायला मिळते आहे. 

मोहब्बतें या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री किम शर्मा सध्या सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाही आहे. चित्रपटात शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन हे कलाकार होते.यानंतर तिला चित्रपट मिळू शकले नाहीत आणि २००९ मध्ये मगधीरा चित्रपटानंतर तिला काम मिळणेच बंद झाले.

२००४ साली ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटाद्वारे यशस्वी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री आयशा टाकियाने बर्‍याच चित्रपटात काम केले आहे; पण ती फ्लॉप ठरली. २००९ मध्ये सलमान खानला वॉन्टेड या चित्रपटात रोमान्स केल्यानंतरही तिला फारसे यश मिळू शकले नाही. मग तिने लग्न केले आणि ती सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली. आता ती आपल्या मुलाची काळजी घेते आहे.

अमृता अरोरा यांनी अभिनेत्री फरदीन खानबरोबर २००२ मध्ये आलेल्या कितने दूर कितने पास या चित्रपटाद्वारे करिअरची सुरूवात केली होती. हा चित्रपट यशस्वी झाला पण त्यानंतर अमृता अरोराने अनेक चित्रपटांमध्ये ठळक सीन दिले पण यशस्वी होऊ शकली नाही. ती गोलमाल या चित्रपटात देखील दिसली होती पण मुख्य भूमिकेत नव्हती. सध्या तिच्याकडे काहीच काम नाही.


अभिनेत्री मयूरी कांगो यांनी १९९५ साली नसीम या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली आहे आणि आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकली. यानंतर तिने बर्‍याच चित्रपटामध्ये काम केले पण यशस्वी होऊ शकली नाही. 

अभिनेत्री मयुरी कांगोचे  घरसे निकलते ही चित्रीत केलेले गाणे खूप लोकप्रिय झाले.

Web Title: It is difficult for these actresses who got star from their first movie to get a job now, find out who they are.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.