शूटिंगच्या पहिल्याच दिवशी असे काही घडले की, माधुरी दीक्षित संजय दत्तची ‘सजनी’ बनली!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 01:56 PM2017-12-13T13:56:03+5:302017-12-13T19:26:03+5:30
हा ९० च्या दशकातील किस्सा असून, या चित्रपटाच्या सेटवरच माधुरी आणि संजय दत्तची प्रेमकथा बहरली. वाचा सविस्तर!
ब लिवूडमध्ये ९० चे दशक रोमान्सचे दशक म्हणून ओळखले जाते. कारण या काळात अनेक प्रेमकथा समोर येत होत्या. यापैकीच एक प्रेमकथा अभिनेता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची होती. त्याकाळी बॉलिवूडमध्ये माधुरी-संजूबाबाची लव्हस्टोरी सर्वाधिक हॉट टॉपिक होती. ‘साजन’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली अन् पुढे या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर दोघांनी बॅक टू बॅक दोन चित्रपट केले. ज्यामध्ये ‘खलनायक’ आणि ‘थानेदार’ यांचा समावेश आहे. मात्र १९९१ मध्ये आलेला ‘साजन’ हा चित्रपट दोघांसाठी खूपच स्पेशल होता. खरं तर खूपच लोकांना माहिती आहे की, ‘साजन’मधून चर्चेत आलेल्या माधुरीचा या चित्रपटाशी काहीही संबंध नव्हता. जर ती घटना घडली नसती तर कदाचित माधुरी या चित्रपटात नसती.
‘साजन’ या चित्रपटासाठी माधुरी निर्मात्यांची पहिली पसंत नव्हती. चित्रपटाचे दिग्दर्शक लॉरेंस डिसूझा यांनी माधुरीअगोदर दुसºया एका अभिनेत्रीला फायनल केले होते. मात्र चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी अशी काही घटना घडली, ज्यामुळे ही भूमिका माधुरीच्या पदरात पडली. त्याचे झाले असे की, दिग्दर्शकांनी या चित्रपटासाठी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्का हिला फायनल केले होते. कॉस्ट्यूम ट्रायल ते रिहर्सलपर्यंत सर्व काही पार पडले होते. परंतु शूटिंगच्या पहिल्याच दिवशी आयशा आजारी पडली. तिला एवढा ताप होता की, डॉक्टरांनी तिला सक्तीचा आराम सांगितला होता.
आयशाच्या आजारपणामुळे चित्रपटाची शूटिंग थांबली होती. परंतु दिग्दर्शक लॉरेंस डिसूझा शूटिंग अधिक काळ थांबवू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू केला. त्यात माधुरीने या भूमिकेसाठी उत्सुकता दाखविल्याने, त्यांनी तिची निवड केली. पर्यायाने माधुरी आणि संजूबाबाची लव्हस्टोरी याचदरम्यान सुरू झाली. ‘साजन’मध्ये या दोघांव्यतिरिक्त सलमान खानचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे.