'एक चांगला मोठा प्रोजेक्ट मिळायला मला लागली १० वर्षे'; 'छोरी' फेम सौरभ गोयलने व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 06:52 PM2021-12-15T18:52:34+5:302021-12-15T18:53:35+5:30

सिनेइंडस्ट्रीला रामराम करत तीन वेळा आपल्या गावाला परत जाण्यासाठी सामानाची बांधाबांध केल्याचे अभिनेता सौरभ गोयल (Saurabh Goyal) सांगतो.

'It took me 10 years to get a good big project'; Emotions expressed by 'Chhori' fame Saurabh Goyal | 'एक चांगला मोठा प्रोजेक्ट मिळायला मला लागली १० वर्षे'; 'छोरी' फेम सौरभ गोयलने व्यक्त केली भावना

'एक चांगला मोठा प्रोजेक्ट मिळायला मला लागली १० वर्षे'; 'छोरी' फेम सौरभ गोयलने व्यक्त केली भावना

googlenewsNext

अभिनेत्री नुसरत भरूचा(Nushrat Bharucha )चा नुकताच छोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात नुसरत सोबत सौरभ गोयल मुख्य भूमिकेत आहे. ‘छोरी’ हा ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा रिमेक असून या चित्रपटात त्याने गरोदर नायिकेचा पती, हेमंतची व्यक्तिरेखा साकारली आहे. छोरी चित्रपटाबाबत उत्साही असलेल्या सौरभला हे आठवते आहे की, या आव्हानात्मक आणि जीवघेणी स्पर्धा असलेल्या व्यवसायात आपण आता आणखी तग धरून राहू शकणार नाही या विचाराने त्याने कित्येकदा आपल्या सामानाची बांधाबांध केली होती.

सौरभ म्हणतो, “नैनीतालजवळच्या किछा या गावातून मी आलो आहे. या गावातल्या इतर सर्व मुलांप्रमाणेच मीही इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन शिकलो. माझ्या कुटुंबियांची इच्छा होती की मी त्यांच्याच व्यवसायात जाऊन स्थिरस्थावर व्हावे. माझ्या आईवडिलांच्या आनंदासाठी मी इंजिनियरिंग तर पूर्ण केले, पण त्यानंतर मात्र या मायानगरी मुंबईत येण्याचा आणि अभिनेता बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्याचा मोह मला टाळता आला नाही.”
“एक चांगला मोठा प्रोजेक्ट मिळायला मला १० वर्षे लागली. मला मोठ्या पडद्यावर बघून माझ्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होते, हे बघायला मी आतुर झालो आहे. कारण माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याच्या माझ्या या प्रवासात त्यांना खूप काही सोसावे लागले आहे. त्यांना सतत या व्यवसायातल्या अज्ञात पायवाटांची भीती आणि काळजी वाटायची की, मला जर हे साध्य झाले नाही तर? आपल्या आईवडिलांकडे परत येण्यासाठी मी तीन वेळा सामान बांधून तयार झालो होतो, पण कसे कोण जाणे, मला बळ मिळाले आणि याच व्यवसायात मार्ग काढण्याचा निर्धार मी करू शकलो.”

बऱ्याच जाहिरातीत सौरभने केलंय काम
सौरभने व्हिसलिंग वुड्समध्ये शिक्षण घेतले आहे. टीव्हीवरील जाहिरातींमधून तो बराच लोकप्रिय झाला आहे आणि नागेश कुकनूरच्या ‘शोर से शुरूआत’ सारख्या काही चित्रपटांत त्याने आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. तो अलीकडे रघुवीर यादव आणि श्वेता बसू प्रसाद अभिनीत जामुन चित्रपटात दिसला होता. त्याशिवाय, मिलेनियल्सच्या नात्यातील खरी बाजू दाखवणार्‍या ‘घर पे बताओ’ या अत्यंत हृदयस्पर्शी सिंगल-शॉट फीचर फिल्ममध्ये देखील त्याने काम केले आहे. 

Web Title: 'It took me 10 years to get a good big project'; Emotions expressed by 'Chhori' fame Saurabh Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.