तर अशी झाली होती आमिर खानची पहिल्यांदा सलमान खान आणि शाहरुख खानसोबत भेट..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 10:00 AM2017-10-28T10:00:48+5:302017-10-28T15:37:20+5:30
बॉलिवूडचे तीन खान सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यातील मैत्री वेगळीच आहे. सध्या ते एकत्र फार कमी ...
ब लिवूडचे तीन खान सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यातील मैत्री वेगळीच आहे. सध्या ते एकत्र फार कमी दिसतात पण काहीही असो आमिर सलमान आणि शाहरुख यांच्या मैत्रीवर याचा काही परिणाम होत नाही. काही दिवसांपूर्वीच आमिरने सलमान आणि शाहरुखसोबत असलेल्या त्याच्या संबंधाबाबत चर्चा केली. यावेळी आमिरने सलमान आणि शाहरुख यांच्यासोबत त्याची पहिली भेट कुठे झाली याचा खुलासा केला.
स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार अमिरने सर्वप्रथम सलमान खानबद्दल बोलताना सांगितले कि तो आणि सलमान एकाच शाळेत शिकले आहेत. ऐवढेच नाही तर ती एकाच वर्गात शिकले आहेत. सलमान आणि मी पहिल्यांदा बाब्ला (डायरेक्टर आदित्य भट्टाचार्य )च्या घरी भेटलो. त्यांनी १९८९ मध्ये 'राख'चित्रपट तयार केला होता. तसेच मी आणि सलमान एक वर्ष एकाच वर्गात शिकत होतो. पाली हिलच्या सेंट एनीमध्ये आम्ही एकत्र होतो. मात्र आम्ही एकमेकांना ओळ्खयचो नाही. एके दिवशी बाब्लाच्या घरी मी एका शॉर्ट फिल्मच्या चर्चेसाठी गेलो होतो. ह्या चित्रपटात मी काम करत होतो आणि हा माझा पहिलाच चित्रपट होता. त्यावेळेस मी १५ वर्षांचा होतो. सलमान खान बाब्लाच्या परिचित होता त्यांच्या घरीच आमची एकमेकांची ओळख झाली. आम्ही दोघांनी बाल्कनीमध्ये बसून गप्पा देखील मारल्या होत्या.
यानंतर आमिर खान शाहरुख खानसोबत झालेल्या मुलाखतीबाबत बोलताना म्हणाला, मी जुही चावलासोबत कोणत्या तरी रस्त्यावर शूट करत होतो. तेव्हा शाहरुख खानचा चित्रपट राजू बन गया जेंटलमनच्या शूटिंगलासुद्धा सुरुवात झाली होती आणि जुही चावला त्या चित्रपटातसुद्धा काम करत होती. त्यावेळी आमची पहिली ओळख झाली होती.
सध्या तिनही खान बॉलिवूडवर राज्य करित आहेत. नुकताच आमिर खानचा सीक्रेट सुपरस्टार रिलीज झाला आहे तर ख्रिसमसच्या मुहुर्तावर सलमान खानचा टायगर जिंदा है प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच शाहरुख खान आनंद एल राय यांच्या चित्रपटात दिसणार आहे.