फराह खानने विचारला मलायका अरोराला प्रश्न उत्तर मिळाले अर्जुन कपूरच्या फोटोमुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 04:19 PM2019-04-03T16:19:18+5:302019-04-03T16:20:24+5:30
मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोवर फराह खानने लिहिले आहे की, हे फोटो कोण काढत आहे? तर याचे उत्तर तिला अर्जुनच्या एका फोटोतून मिळाले आहे.
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोजच घडत असतात. कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या मधुर भांडारकराच्या पेज 3 या चित्रपटातील गाण्याद्वारे या नात्यांवर भाष्य करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये कोणाचे तरी अफेअर सुरू होते तर कुणाचं तरी नातं संपत. अशाच यादीतील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेले कपल म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. सध्या मलायका मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. सोशल मीडियावर मलायकाचे व्हॅकेशनवरचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मलायकाचे अंदाज खूपच बोल्ड आणि ग्मलॅरस पाहायला मिळतोय. मालदीव्हज व्हॅकेशनचे आतापर्यंत फक्त मलायकाचेच फोटो पाहायला मिळाले होते. मात्र तिथे तिच्यासोबत अर्जुन कपूरही होता. अर्जुननेही त्याच्या मालदीव्हज व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले आहेत.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकत्र मालदीवला गेले असल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ते दोघे एकत्र फिरत आहेत का याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना देखील लागली आहे. मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोवर फराह खानने लिहिले आहे की, हे फोटो कोण काढत आहे? (Kameeni who is clicking these pics?) हा फोटो अर्जुन काढत आहे का असा प्रश्न अप्रत्यक्षपणे फराहला विचारायचा होता. पण फराहच्या या प्रश्नावर मलायकाने काहीच उत्तर दिले नाही. पण फराहला तिच्या या प्रश्नाचे उत्तर अर्जुनच्याच एका फोटोमुळे मिळाले. अर्जुनने नुकताच मालदीवमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर फराहने मला आता माझे उत्तर मिळाले (Ahhhhh now i get my answer) अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने ती प्रेमात पडल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये त्याच्या रिलेशन स्टेट्सविषयी खुलासा केला होता. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारले असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुनच्या या उत्तराने त्याची बहीण जान्हवी कपूरलादेखील आश्चर्याचा धक्का बसला होता.