बॉलिवूडच्या या प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 01:36 PM2020-05-21T13:36:03+5:302020-05-21T13:37:24+5:30

अभिनेत्याचे आजारामुळे जगणं कठीण झालं होतं. त्यांना बऱ्याच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. 

It was difficult to identify this famous Bollywood villain Rama Reddy, only a body trap was left before his death TJL | बॉलिवूडच्या या प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये गब्बरपासून मोगॅम्बो, शाकालपर्यंत असे कित्येक खलनायक झाले. जे आजही रसिकांना चांगलेच लक्षात आहेत. त्यातीलच खलनायकाची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता रामी रेड्डी. त्यांनी साकारलेल्या भूमिकेमधील दहशत आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

रामी रेड्डी क्रुर भूमिकांसाठी ओळखला जातो. मग 1993 साली रिलीज झालेला वक्त हमारा हैमधील कर्नल चिकारा असेल किंवा प्रतिबंधमधील अन्नाची भूमिका. रामी रेड्डी यांनी प्रत्येक भूमिका सक्षमपणे साकारल्या. जवळपास 250 हून अधिक सिनेमात त्यांनी काम केले. लिव्हरच्या आजारामुळे ते पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करू शकले नाही.


यकृताच्या आजारामुळे ते जास्त वेळ घरातच व्यतित करू लागले आणि हळूहळू लोकांमध्ये जाणं टाळू लागले. एकदा ते एका इव्हेंटमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना ओळखणं कठीण झालं होते. खरेतर रामी त्यावेळी खूप कमजोर दिसत होते आणि खूप बारीक झाले होते. जेव्हा ते एका तेलगू अवॉर्ड फंक्शनला आले होते. त्यांना पाहून कोणाला विश्वासच बसत नव्हता की हे रामा रेड्डी आहेत.
रामी यांना लिवरनंतर किडनीच्या आजारानेही ग्रासले. ज्यावेळी त्यांचे निधन झाले त्यावेळी फक्त हाडांचा सापळा राहिला होता. अखेरच्या वेळी त्यांना कॅन्सरही झाल्याचे बोलले जात होते.


काही महिने उपचार केल्यानंतर 14 एप्रिल, 2011 साली सिकंदराबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा निरोप घेतला होता.
रामी रेड्डीने बॉलिवूडमध्ये बऱ्याच सिनेमात काम केले. त्यात वक्त हमारा है, ऐलान, दिलवाले, खुद्दार, अंगरक्षक, आंदोलन, हकीकत, अंगारा, रंगबाज, कालिया, लोहा, चांडाला, हत्यारा, गुंडा, दादा, जानवर, कुर्बानियां आणि क्रोध या चित्रपटांचा समावेश आहे.

 

Web Title: It was difficult to identify this famous Bollywood villain Rama Reddy, only a body trap was left before his death TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.