लाऊड स्पीकरवर नको अजान...! अजानबद्दल ट्विट करून फसले जावेद अख्तर!! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 12:19 PM2020-05-10T12:19:22+5:302020-05-10T12:20:57+5:30

जावेद अख्तर यांनी अजानबद्दल ट्विट केले आणि ते ट्रोल झालेत. वाचा काय केले ट्विट

It was haraam, then became halaal': Javed Akhtar stokes row, says 'azaan' on loudspeaker causes discomfort-ram | लाऊड स्पीकरवर नको अजान...! अजानबद्दल ट्विट करून फसले जावेद अख्तर!! 

लाऊड स्पीकरवर नको अजान...! अजानबद्दल ट्विट करून फसले जावेद अख्तर!! 

googlenewsNext
ठळक मुद्देअन्य एका युजरने तर त्यांना चांगलेच सुनावले.

बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर ट्विट करतील आणि चर्चेत येणार नाहीत, असे शक्यच नाही. जावेद यांचे एक ट्विट सध्या काहीसे वादात सापडले आहे. होय, अजानविषयी एक ट्विट करणे त्यांना चांगलेच महागात पडले. या ट्विटनंतर नेटक-यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले.  अजानबद्दल केलेले त्यांचे हे ट्विट अनेकांना रूचले नाही आणि नेटक-यांनी त्यांना फैलावर घेतले. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एक मोठा वादविवाद सुरु झाला.

काय केले ट्विट

‘ भारतात ५० वर्षांपर्यंत लाऊड स्पीकरवर अजान लावणे ‘हराम’ होते. मात्र कालांतराने ते ‘हलाल’ झालें. अशा प्रकारे ‘हलाल’ झाले की त्याची कोणतीही सीमा राहिली नाही. अजान करणे  चांगली गोष्ट आहे. मात्र लाऊड स्पीकरवर अजान लावल्यामुळे त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे या परिस्थितीत तरी ते बदलतील, अशी आशा मला आहे,’ असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले.

लोकांनी केले ट्रोल


 
जावेद अख्तर यांचे अजानबद्दलचे हे ट्विट लगेच व्हायरल झाले. अनेक युजर्सनी त्यांना ट्रोल केले. ‘लाऊड स्पीकरवर फक्त अजान बंद करण्याचा सल्ला देऊन स्वत:चे सेक्युलॅरिज्म सिद्ध करण्याची गरज नाही. बंदी आणायचीच तर लाऊड स्पीकरवर संपूर्णपणे बंदी आणा. मग ती गणेश चतुर्थी असो किंवा अजान. कोणत्याही धमाचे कोणतेही कार्य असू देत लाऊड स्पीकर बंदच ठेवा,’ असे एका नेटक-याने यावर कमेंट करताना लिहिले.

अन्य एका युजरने तर त्यांना चांगलेच सुनावले. ‘तुमच्या मताशी मी पूर्णपणे असहमत आहे. कृपया इस्लाम व त्याच्याशी संबंधित श्रद्धांवर बोलणे थांबवा. आम्ही लाऊड स्पीकरवर गाणी वाजवत नाही़ तर अजान वाजवतो. जी एक अतिशय सुंदर प्रार्थना आहे,’ असे या युजरने लिहिले.

   

Web Title: It was haraam, then became halaal': Javed Akhtar stokes row, says 'azaan' on loudspeaker causes discomfort-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.