Alia bhat : बधाई हो! कपूर कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, आलिया-रणबीर झाले आई-बाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 12:46 PM2022-11-06T12:46:33+5:302022-11-06T13:23:41+5:30
Alia Bhatt and Ranbir Kapoor's First Child Is Born : आज सकाळी आलियाला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती करण्यात आलं. या ठिकाणी आलियाने आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Alia Bhatt and Ranbir Kapoor's First Child Is Born : आज कपूर कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. होय, आलिया भट (Alia Bhatt) व रणबीर कपूर ( Ranbir Kapoor)आईबाबा झाले आहेत. आज आलियाने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. आज सकाळी आलियाला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती करण्यात आलं. या ठिकाणी आलियाने आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. आई व तिच्या चिमुकलीची प्रकृती उत्तम असल्याचं कळतंय. सध्या आलिया व रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही गोड बातमी ऐकून चाहतेही क्रेझी झाले आहेत.
आज सकाळी रणबीर-आलिया मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलबाहेर दिसले होते. याचक्षणी आलिया कोणत्याही क्षणी बाळाजा जन्म देणार, हे स्पष्ट झालं होतं. पाठोपाठ नीतू सिंग, आलियाचे आई बाबा सोनी राजदान व महेश भटही रूग्णालयात पोहोचले. यानंतर काहीच तासांत आलियाने कन्यारत्नाला जन्म दिला.
आलिया व रणबीरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. अगदी मोजक्या कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. लग्नानंतर उण्यापुऱ्या दोनच महिल्यात या जोडप्यानं गुडन्यूज शेअर केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यामुळे आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, अशी चर्चा सुरू झाली होती. अगदी करण जोहरनेच नकळत याची पोलखोल केली होती. ‘कॉफी विद करण 7’च्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया आणि रणवीर सिंग गेस्ट म्हणून सहभागी झाले होते. या एपिसोडमध्ये आलियाने अनेक खुलासे केलेत. अगदी लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून रणबीरनं तिला कधी, कुठे प्रपोज केलं होतं, इथपर्यंतचे अनेक खुलासे तिने केलेत. शिवाय करण जोहरबद्दलही ती बोलली. मी लग्नाबद्दल सांगितल्यावर करण रडला होता, असं ती म्हणाली.
हे सांगताना आलिया म्हणाली, ‘मी जेव्हा आमच्या लग्नाबाबत सांगण्यासाठी करणच्या ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा करणचा बॅड हेअर डे होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि त्यामुळे वैतागून तो हेअर कॅप घालून बसला होता. मी त्याला सर्व गोष्ट सांगितली. लग्न करणार असल्याचा निर्णय सांगितला, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आनंदाने त्याला रडू आलं.
आलियाने कॉफी विद करण 7 च्या एपिसोडमध्ये सांगितलेला हाच किस्सा करण जोहरनेही सांगितला होता. पण एका वेगळ्या संदर्भाने आणि याचमुळे आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. आलियाने गुड न्यूज दिल्यानंतर करण माध्यमांशी बोलला होता. ‘आलिया ऑफिसमध्ये आली तेव्हा मी हेअर कॅप घालून बसलो होतो. त्यावेळी तिने मला गुडन्यूज सांगितली. आलिया माझी मानलेली मुलगी आहे. माझ्या बाळाला बाळ होणार हे ऐकून मला आनंदाने रडू कोसळलं...,’ असं करण म्हणाला होता.
आलिया व करणने सांगितलेल्या याच दोन्ही वक्तव्यांना जोडून आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असा अंदाज बांधत गेला होता.