It's shocking : 'गोल्ड'च्या सेटवर शूटिंग दरम्यान कुणी चोरले कुणाल कपूरचे पाकीट?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2017 09:09 AM2017-07-22T09:09:51+5:302017-07-22T14:45:33+5:30
अक्षय कुमारचा चित्रपट गोल्डची शूटिंग सुरु झाली आहे. अक्षय कुमारसहित चित्रपटातील अनेक कलाकार शूटिंगसाठी लंडनमध्ये आहेत.याआधी ही अनेक चित्रपटांची ...
अ ्षय कुमारचा चित्रपट गोल्डची शूटिंग सुरु झाली आहे. अक्षय कुमारसहित चित्रपटातील अनेक कलाकार शूटिंगसाठी लंडनमध्ये आहेत.याआधी ही अनेक चित्रपटांची शूटिंग लंडनमध्ये करण्यात आली आहे. मात्र यावेळी अभिनेता कुणाल कपूरसोबत लंडनमध्ये एक अप्रिय घटना घडली आहे. मुंबई मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार चित्रपटच्या सेटवरुन त्याचे पाकीट चोरीला गेले आहे ज्यात त्याचे सगळे कार्ड्स होते. कुणालाने हा सगळा प्रकार त्याच्या मित्राला सांगितला. तसा त्याचा मित्र त्याच्या मदतीला आला. यानंतर काही दिवसांनी लंडनमध्ये शूटिंगच्या ठिकाणी कुणालची पत्नी नैना बच्चन पोहोचली. यानंतर नैना आणि कुणाल भारतात परतले आहे. मात्र त्यांना घडल्या प्रकारबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
ALSO READ : अक्षय कुमार आणि मौनी रॉय यांच्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक!
गोल्डचा चित्रपटाचे दिग्दर्शन रिमा कागती करते आहे. यात अक्षय कुमार पद्मश्री बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने 3 वेळा ऑलिम्पिंकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वातील हॉकी संघाने १९४८, १९५२ व १९५६ साली झालेल्या ऑलिम्पिंक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले आहे. बलबीर सिंग यांना हॉकीमध्ये गोलचे उस्ताद मानले जाते. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांचे प्रोडक्शन मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अक्षय कुमारने यात काम करण्यासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन आकारले आहे. त्यांने ‘गोल्ड’ चित्रपटासाठी ५० कोटी रुपये आकारले आहेत. या चित्रपटातून मौनी रॉय बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते. 5 ऑगस्ट 2018 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.